हायकू – हिरवासा बांबू
हायकू हिरवासा बांबू इवलासा पक्षी म्हणतोय्, इथें किती थांबू ? – सुभाष स. नाईक
हायकू हिरवासा बांबू इवलासा पक्षी म्हणतोय्, इथें किती थांबू ? – सुभाष स. नाईक
हायकू कांहीं पानं पिवळी कांहीं पानं हिरवी अन् कुठे कुठे इवलीशी पालवी. – सुभाष स. नाईक
हायकू पानगळीचा मोसम कांहीं पानं तगली, जगली कांहीं झडली, पाचोळा बनून पडली. – सुभाष स. नाईक
हायकू तृषिताची तहान घोटभर पाण्यानं भागत नाहीं. पण मृत-संहीवनी म्हणून अमृताचा एक थेंबही पुरतो त्यासाठी रांजणभर लागत नाहीं. – सुभाष स. नाईक
हायकू पिवळे दिवे, पांढरे दिवे, रंगीतही हवे ? अंधार हटवायला कुठलाही चालतो दिव्यांच्या इंद्रधनुष्याची गरजच काय ? – सुभाष स. नाईक
हायकू डॉक्टरची वेटिंग-रूम सर्टिफिकिटं हारीनं टांगलेली पेशंटस् ची गर्दी, चहूंकडे पांगलेली ( हारीनं : रांगेनें ) – सुभाष स. नाईक
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions