V-0021

नम्रता हा ज्ञानाचा खरा आरंभ आहे. गुरुजवळ शिष्य रिकामे मन घेऊन जातो. विहिरीत अपरंपार पाणी आहे, पण भांडे जर वाकणार नसेल, तर त्यात पाण्याचा एक थेंबही येणार नाही, शिरणार नाही. ज्ञानाचे जे सागर असतात, त्यांच्याजवळ जोपर्यंत आपण वाकणार नाही, निमूटपणे त्यांच्या चरणाजवळ बसणार नाही, तोपर्यंत ज्ञान आपणांस मिळणार नाही. भरण्यासाठी वाकावयाचे असते. वाढण्यासाठी नमावयाचे असते.
— साने गुरुजी