V-540

झोपताना मेंदूला कुलूप लावले पाहिजे. गाढ आणि नि:स्वप्न निद्रेत मनुष्य आपल्या मूळ स्वरुपात लीन होतो. फक्त अज्ञान शिल्लक असते, म्हणून परत येतो. अज्ञान नष्ट झाले, तर मनुष्य एकदम ईश्वरापाशी पोहोचेल, मुक्त होईल. जितकी गाढ, नि:स्वप्न निद्रा घेऊ, तितकी परमेश्वरात लीन होण्याची संधी आहे.
— आचार्य विनोबा भावे