नवीन लेखन...

अंतर्वक्र आरसे

सगळेच आरसे गुळगुळीत असले तरी सपाट असतीलच असं नाही. काही आरसे गोलाकार असतात. किरणांना आल्या दिशेनं परत पाठवणारे त्यांचे पृष्ठभाग एखाद्या गोलाच्या कापलेल्या भागासारखे असतात. गोलाकार आरशांचेही दोन प्रकार आहेत. एक आतल्या बाजून गोल असतो. याला अंतर्वक्र आरसा असं म्हणतात. वर्तुळाचा किंवा चेंडूसारख्या गोलाचा केंद्रबिंदू असतो. त्या बिदूपासून त्या गोलावरच्या कोणत्याही बिंदूचं अंतर समान असतं. तसाच या अंतर्वक्र आरशांचाही केंद्रबिंदू असतो. पण त्या आरशावर दूरवरून येणारे समांतर किरण मात्र परावर्तन झाल्यावर दुसर्‍याच एका बिंदूवर एकत्र येतात.

त्याला त्या आरशाचा फोकस म्हणतात. सर्वसाधारण अंतर्वक्र आरशांच्या फोकसचं पृष्ठभागापासूनचं अंतर केंद्रबिंदूच्या अंतराच्या बरोबर अर्धं असतं. सपाट आरशावरून परावर्तित होणार्‍या किरणांचे नियम अंतर्वक्र आरशांवरून होणार्‍या परावर्तनालाही लागू पडतात. पण या आरशांच्या परावर्तनाचे दोन आणखी खास नियम आहेत. दूरवरून येणारे समांतर किरण परावर्तित झाल्यावर फोकसमधूनच पुढं जातात. तर दुरवरून आलेले पण फोकसमधून जाणारे किरण मात्र परावर्तित झाल्यावर समांतर प्रवास करू लागतात.

या दोन नियमांच्या आधारे मग कोणत्याही वस्तूची प्रतिमा कुठं पडेल हे शोधून काढता येतं. या परावर्तनाच्या नियमाचा फायदा मोटारगाडीच्या पुढच्या दिव्यांमध्ये मोठ्या कल्पकतेनं करून घेतलेला दिसून येतो. या दिव्यांमध्ये पत्र्याचा एक अंतर्वक्र परावर्तक म्हणजेच आरसा बसवलेला असतो. त्या दिव्याचा बल्ब त्या आरशाच्या फोकसवर ठेवलेला असतो. त्या दिव्यातून निघणारे किरण आरशावरून परावर्तित झाले की त्यांचा समांतर किरणांचा एकच एक झोत दूरवर पसरू शकतो. त्यामुळं मोटारीच्या पुढचा दूरवरचा रस्ता उजळून निघतो. रात्रीच्या अंधारातही चालकाला दूरवरचा आसमंत स्वच्छ दिसू शकतो. दूरवरच्या वस्तूची या आरशात सत्य प्रतिमा मिळते. म्हणजे तिच्यात वर-खाली अशी उलटापालट झालेली असते आणि प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकारापेक्षा लहान असतो. पण तीच वस्तू जर आरशाच्या फोकसपेक्षाही जवळ असेल तर मात्र प्रतिमा आभासी स्वरुपाची असते. तिची उलटापालट होत नाही पण तिचा आकार मात्र मोठा होतो. म्हणूनच दाढी करण्यासाठी अशा आरशाचा वापर करतात.

— डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..