[ccavlink]book-top#nachiket-0014#१५०[/ccavlink]
नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “अथांग अंतराळाचा वेध” या जवळपास सव्वाशे पानांच्या पुस्तकात लेखक डॉ. मधुकर आपटे यांनी संपूर्ण विश्वाची अगदी थोडक्यात परंतु वाचनीय माहिती दिली आहे. सर्व वयोगटांना वाचण्यासारखे पुस्तक आहे.
या अनंत विश्वाचा पसाराही अनंत आहे, इतकेच नाही तर विश्वाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे हे विश्व खरोखर कसे आहे ? ते नेमके किती विशाल आहे ?
त्यातील प्रमुख घटक कोणते या सार्याच गोष्टींचा वेध लेखक डॉ. आपटे यांनी 16 प्रकरणांच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विश्वाची रचना, व्याप्ती, कल्पना, विश्वाची निर्मिती, दीर्घिका म्हणजे काय? आकाशगंगा म्हणजे काय? आपल्या पृथ्वीच्या जवळचे विश्व कसे आहे, आपला जीवनदाता सूर्य, तार्यांची उत्पत्ती, स्थिती आणि लय, नक्षत्र, राशी, अवकाशात बुद्धिमान सजीवांचे वास्तव्य, अनंत अवकाशात आपण एकटे आहोत का? अवकाशातील निवास क्षेत्रे, सुलभ आकाश दर्शन, खगोलशास्त्रीय मोजमापपद्धती तार्यांचे प्रकार, प्रत आणि दीप्ति आणि नवीन ग्रहमालांचे वेध या प्रकरणांद्वारे डॉ. मधुकर आपटे आपल्याला विश्वाचा अंतरंगात घेऊन जातात.
पुस्तक वाचत असताना पृथ्वी व पृथ्वीवरील मानवप्राणी किती क्षुल्लक आहे, याची कल्पना येते. दुसरीकडे अनंत अवकाशाच्या पसार्यात आपण एखाद्या मातीच्या कणाप्रमाणे असलो तरी या अनंत अवकाशाचा वेध घेण्याची व ते जाणून घेण्याची कुवत पृथ्वीवरील मानवात आहे, हेही लक्षात घ्यावेच लागेल.
थोडक्यात डॉ. आपटे यांचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. खगोल व अवकाश शास्त्राचा चांगला परिचय करून देणारे आहे.इतके अभ्यासनीय पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल नचिकेत प्रकाशन अभिनंदनास पात्र आहे. प्रत्येकाने जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.
अथांग अंतराळाचा वेध
पाने : 128 ; किंमत : 125 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
— श्री.अनिल रा. सांबरे
Leave a Reply