आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे…हे कोठे तरी थांबायला नको का ?
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
मो. 9029338268