स्त्री – पुरुष दोन भिन्न व्यक्ती भिन्न भिन्न प्रवृतीच्या
तरी अजूनही का लग्नाच्या दावणीला एकत्र बांधले जाता आहेत
संस्कृतीच्या नैतिकतेच्या आणि धर्माच्या नावावर ?
हे थांबेल कदाचित स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आल्यावर……….
मनुष्य प्राणी इतर प्राण्यासारखा एक
मग त्यालाच का काम करावे लागते उदरनिर्वाहासाठी ?
आणखी काय होणार मनुष्य स्वतालाच ईश्वर समजू लागल्यावर ……
प्रेम हृदयात निर्माण होते हि भ्रामक कल्पना बुद्धीजीवीही
अजून किती दिवस कवटाळत बसणार आहेत खुळ्यासारखी ?
ते तरी काय करणार प्रेम मेंदूत असत हे मानायला मेंदूच तयार नसल्यावर ……
स्त्री – पुरुष समानता प्रत्यक्षात आली तर ते घातक ठरेल का समाजाला ?
हो ती समानता चुंबकाच्या दोन टोका सारखी असल्यावर …..
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply