ठाणे येथे होणार्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने……….परिसंवादाचा विषय: अनुवादित साहित्यामुळे मराठीच्या कक्षा रुंदावल्या आहेत का?
सध्या मोठ्या प्रमाणात अनुवादित पुस्तकांची निर्मिती होत आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांचा अनुवाद हा एक भाग झाला. पण इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादित आवृत्तीही मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत आणि त्यांचा
हातोहात खपही होत आहे. या अनुवादित साहित्यामुळे मराठी भाषेचा फायदा होतोय की तोटा? इतर भाषांतील साहित्याची अनुवादित रुपं जर मराठीत येत असतील तर मग मराठीतील पुस्तकंही इतर भाषांमध्ये अनुवादित
व्हायला हवी. तसं होतंय का?
एकूणच मराठी भाषेच्या कक्षा रुंदावायला अनुवादित साहित्याचा काही हातभार लोगतोय का?
याच विषयावर ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर
मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
— परिसंवाद
Leave a Reply