आपल्या अभिनयाने व डान्सने सगळ्यानांच भारावून टाकणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी झाला.
हृतिक रोशनच्या वाटचालीचा विचार करायचा झाला तर, वडील राकेश रोशन यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा घेऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात हृतिक यशस्वी ठरला. ‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटात आपले नाणे खणखणीत असल्याचे त्याने सिद्ध केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘फिजा’, ‘मिशन काश्मीर’, ‘कोई मिल गया’ या चित्रपटानंतर तो प्रस्थापित नायक बनला. ‘कहो ना प्यार है’ हा पहिला चित्रपट सुपर-डुपर हिट ठरल्यानंतर तो त्याची मैत्रीण सुझान हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. विवाहापूर्वी सुझानशी त्याची मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १२ वर्षापासून त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना रेहान व रिधान ही दोन मुले आहेत. विवाहसंस्थेचा पूर्णपणे सन्मान ठेवून हृतिकने अत्यंत जड अंत:करणाने पत्नीशी विभक्त झाला. हृतिक हा बॉलिवुडमधील सुजाण व विचारी अभिनेता म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील बहुतेक मंडळी केवळ फॅशनेबल कपडे आणि इतर प्रकारचे बडेजाव करत फिरत असताना हृतिक मात्र पुस्तकात रमतो. प्रत्येक भूमिकेचा तपशीलवार अभ्यास आणि ती परिपूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतो. याच हृतिकने आपल्या खासगी जीवनात बाब उघड करताना सभ्य व सुजाणपणाचे दर्शन घडवले. पडद्यावरील आदर्श सुपरमॅनप्रमाणेच खासगी आयुष्यात त्याने आपले सभ्यपण जपले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply