नवीन लेखन...

अमर भुपाळी (१९५१)

    

राजकमल कलामंदिर निर्मित हा चित्रपट १९५१ मध्ये पडद्यावर आला. विश्राम बेडेकर यांची कथा, वसंत देसाईंचं सुमधुर संगीत, आणि लता मंगेशकरांच्या आवाजातील अप्रतिम गाणी ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये.

या चित्रपटातील होनाजीची प्रमुख भूमिका साकारली पंडितराव नगरकर यांनी. याचबरोबर संध्या, ललिता पवार, भालचंद्र पेढारकर यांच्या भूमिका आणि व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट सदाबहार चित्रपटांपैकी एक अशी ओळख निर्माण करुन गेला.

घन:श्याम सुंदरा ही अमर भूपाळी लिहिणारा होनाजी हा गवळी समाजात जन्माला आला. पेशव्यांच्या वाडय़ावर सकाळी दुधाचा रतीब घालणे आणि सायंकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी त्यांचे तसेच इतरेजनांचेही मनोरंजन करणे हे दोन्ही उद्योग होनाजीने केले. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसाच शाहिरीचा व्यवसायही वंशपरंपरागतच. त्याचे आजोबा साताप्पा किंवा शांताप्पा हे आणि त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा कारंजकर या नावाचा शिंपी होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजवला आणि होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले.

होनाजीचे खास वैशिष्ट्य असे की, त्याने तमाशाला बैठकीतल्या शास्त्रीय गाण्याचे स्वरुप आणून देण्याचा प्रभावी प्रयत्न केला. तमाशा- लावणीला तबल्याच्या ठेक्याची साथ देणे, होनाजीने सुरु केले. शास्त्रीय गायन तमाशात आणणे आणि ढोलकीबरोबर वा स्वतंत्रपणे तबल्याचा ठेका घेणे अनेकांना मंजूर नव्हते.

त्यामुळे विरोधकांनी दुसर्‍या बाजीरावाचे कान भरले आणि होनाजीला तमाशात तबला आणण्यास मनाई झाली. होनाजी हट्टाला पेटला. त्याने आव्हान, म्हणूनच ही घटना स्वीकारली. तो आपल्या अहिली नावाच्या शिष्येला सोबत घेऊन पुणे सोडून मुंबईला आला. मुंबईत सहा महिने राहून त्या शिष्येच्या गळ्यावर त्याने शास्त्रीय गायकीचे संस्कार केले आणि व्यवस्थित तालीम देऊन लावणी शास्त्रीय ढंगात म्हणण्यात त्या शिष्येला पारंगत करुन तबल्याचा समावेश पुन्हा दरबारच्या कार्यक्रमात सुरु केला. होनाजीने लावणीच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले. अमर भूपाळी चित्रपटात आलेली सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, लटपट लटपट तुझं चालणं इत्यादी अनेक गाणी मूळ होनाजीच्याच रचनेतून थोडय़ाफार फरकाने घेतलेली आहेत.

चला तर मग पाहूया …. अमर भुपाळी

— मराठीसृष्टी व्यवस्थापन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..