मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. चौकटीबाहेरचा विचार करणार्या या कंपनीने मराठीत “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटाची निर्मिती केली. अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्या वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल. ६ फेब्रुवारी १९३२ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्गा खोटेंच्या रुपाने भारतातील (बोल) चित्रपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला.
चला तर मग पाहूया, याच चित्रपटातील एक गाणं..
—
Leave a Reply