|| हरि ॐ ||
प्रेमात सगळं क्षम्य असतं,
मागून ते मिळत नसतं,
मनापासून ते यावं लागतं !
हृदयातून ते पाझराव लागतं !
प्रेमाला कुठली व्याख्या नसते,
ते निष्पाप असावं लागतं म्हणून आपोआप होत असतं,
वर वर करता येत नसतं!
प्रेमात अदभूत शक्ती असते
दुरावालेल्यांना एकत्र आणते,
मऊ रेश्मी धाग्याने,
ऋणानुबंधनात अडकवि असते !
प्रेमचा नसतो भरावयाचा बाजार,
बळाचा आणि रागाचा नसावा त्या आधार,
संपत्ती आणि दिसणेपणाच्या जोरावर
कधीच टिकत नाही फार काळ !
मुलीच मुलावर प्रेम असतं
टपोऱ्या डोळ्यात दिसत असतं,
मुलांचं मात्र तस नसतं
कधी कधी बदलत असतं?
म्हणून म्हणतात प्रेम आंधळ असतं
प्रेमात सगळ गुलाबी दिसतं,
सगळं कसं गोड गोड असतं,
‘व्हॅलेनटाइन डे’ला खरंखुर व्यक्त करायचं असतं !
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply