“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय. कुणी आपणच कसे ब्रम्ह हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतय तर कुणी स्वत: ब्रम्ह असल्याचं समजत आहेत आता आम्हा तरुणांपुढे प्रश्न हा आहे की, नेमकं ब्रम्ह कोण? कोणाला म्हणायच आम्ही ब्रम्ह? दोनचार कविता लिहुन एखादा नवखा कवी आपण खूप मोठे कवी झाल्याचा भ्रम निर्माण करतो आणि आपली जागा व्यासपीठावर कशी ते जितक्या सहजपणे बोलण्याचा प्रयत्न करतो आणि आपली नाळ थेट व्यासपीठाशीच जोडतो अशीच काहीशी गत आजच्या नवनवोन्मेव तरुणांची होत आहे.
प्रचंड स्पर्धा असलेल्या युगात आपण वावरत आहोत याचे भान हरपुन बसलेली काही अपवादात्मक तरुण मंडळी यशात इतकी वावहत जातात की, बुडत्याला कवीचा आधार ही कठीण होऊन बसतो. एका काव्य वाचन स्पर्धेतला किस्सा आठवतो. एकाच कुटुंबातील तीन माणसं कवी. एक आई, दुसरा त्यांची मुलगा, व मुलगी. मुलाने आपल्या कवयीत्री होण्या विषयीचे काही संदर्भ सांगितले. त्यातलाच एक, तो असं म्हटला की, आमची आई कविता लिहित असताना कविता सुचवण्याच्या प्रक्रियेत शंभर कागद फाडते आणि त्यातुन एक कविता जन्माला येते. अर्थात प्रत्येकाची शैली, प्रत्येकाचीच एक विशिष्ठता असणं स्वाभाविक आहे. पण, ती विशिष्ठता अशी जगजाहीर करुन कुठेतरी यशाचा मुकुट सातत्याने शिरपेचावर मिरवणं कितपत योग्य आहे? आपण सर्वश्रेष्ठ कसे आहोत हे दाखविण्याची सतत चाललेली धडपड, त्यातुन निर्माण होणारा अहंभाव, उत्पन्न होणारी अहंपणाची भावना, आपणच कसे ब्रम्ह हे दाखविण्याचा चाललेला निरागस प्रयत्न आणि काहीवेळेस यशाअभावी होणारी उपेक्षा. या सगळ्या गोष्टींचा विचार करता ब्रम्ह होणं खरचं सोपं आहे का? याचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे.
क्षेत्र कोणतही असो स्पर्धा असणं स्वाभाविकच पण, स्पर्धा जिंकण्या आधीच स्वत:ला विजयी घोषित करणं कितपत योग्य. मुलांकडुन पालकांची असणारी अवास्तव अपेक्षा, सर्वच क्षेत्रात बाजी मारुन नेण्याचं उराशी बाळगलेलं एक निरागस हळवं स्वप्न आणि कुठेतरी कमी पडलो तर त्यातुन येणारं नैराश्य. या सगळ्याच गोष्टी पालकांनी सहज स्विकारणं गरजेचं आहे तितकचं ते आपल्या लहानग्याला सहानभुतीपूर्वक स्विकारायला लावणं ही महत्वाचं आहे. एकदा का जिंकायची सवय लागली की, मुलं आणि पालकही हरणं पचवु शकत नाही. पण, जिंकणं आणि हरणं हे आपल्या यशावर कायमचं अवलंबुन असतं असं होत नाही. एखादा चित्रकार सुंदर चित्र काढून बक्षीस जिंकेल तर एखादा कवी त्याच चित्रावर आपल्या प्रतीभेने कवितेच्या माध्यमातुन शब्दांचे रंग भरेल. दोघही श्रेष्ठ कलाकार पण, आपापल्या परीने समाधान हे यश मानत पुढे वाटचाल करणारे. स्पर्धा होणं, बक्षीस मिळवणं म्हणजेच यश संपादन करण्याचं हक्काचं ठिकाण जरुर असेल. पण स्पर्धा, आणि बक्षीस हेच खर्या कलावंतांचं यश आहे असं मी मुळीच मानत नाही. जेव्हा स्पर्धा असते तेव्हा ईर्षा असणं स्वाभाविक आहे. पण, स्पर्धा नसताना प्रतिभा आजमावणं ही सुद्धा एक कलाच आहे. प्रत्येकाला द्वारकेचा राजा श्रीकृष्ण होणं जमणार नाही पण, असं मी मुळीच म्हणणार नाही पण, सुदामा होऊन श्रीकृष्णाला अनुभवणं ती अनुभुती होणं यात सुद्धा आनंद आहे समाधान आहे. त्यासाठी ब्रम्हच असलं पाहिजे असं विधिलिखीत थोडचं आहे?
— प्रकाश बोरडे
Leave a Reply