सहनशील तू, शान्तमुर्ती तू, तू मायेचा झरा..
नमन तुझिया माझे माये, पदरा घे लेकरा..
आधी वंदुनी मज मायेला, जन्म जिणे मज दिला..
तुझ्याच उपकारा ग आई, संसार मी पहिला..
ओटीपोटीची करून झोळी, भोगल्या तू यातना..
तुझ्याच गर्भात मला उमगल्या, विश्वाच्या चेतना..
स्वत सोसुनी अनेक चटके, घडविला पुतळा हा मातीचा..
आटेल जरी समुद्र सारा, आटेना पाझर हा छातीचा..
रिकाम्यापोटी बसून सामोरी, घास भाराविसी मला..
ठेच लागता मला ग माये, वेदना होती तुला..
लोटांगण हे तुझा विधात्या, विनंती हि तूजला..
सुखी ठेव तिज सदा आन तिचे दुख दे मजला…
आपला,
शैलेश देशपांडे
९९७०३६५०३६/९२२६२७०२१६
— शैलेश विलास देशपांडे उर्फ श…
Leave a Reply