MENU
नवीन लेखन...

गीत एक – आठवणी अनेक : “आएगा आनेवाला”

संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या जन्मतिथीच्या निमित्ताने खेमचंद प्रकाश यांचे magnum opus “आएगा आनेवाला”

*1940 च्या दशकातील सुपरस्टार अशोककुमार एकदा लोणावळ्याला आपल्या मित्राच्या बंगल्यावर रहायला गेले होते . तिथे त्यांना प्रत्येक रात्री काही विचीत्र भास झाले . त्यांनी हे भुताटकीचे आपले अनुभव आपल्या मुंबईतील मित्रांना सांगितले व त्यावरून कमाल अमरोही यांनी “महल” चित्रपट लिहीला.

* त्यातलं “आएगा आनेवाला” हे गाणं सात मिनीटं लांबीचं होतं. ते प्रेक्षकांना कंटाळवाणं होईल म्हणून पिक्चरमधून काढून टाका, अश्या सूचना अशोककुमारनी दिल्या . पण खेमचंदजींच्या आग्रहाखातर हे गाणं पिक्चर मध्ये राहिलं व त्याने इतिहास घडवला. हे गाणं रद्द करू नये म्हणून नवोदित गायिका लता मंगेशकर हिने अशोककुमार यांची भेट घेतली होती.

* त्या काळात रेकॉर्डवर गायकाचं नाव छापायची पध्दत नव्हती . त्या व्यक्तिरेखेचं चित्रपटातलं नाव छापलं जात असे . त्यामुळे या रेकॉर्डवर लताचं नाव नसून “कामिनी” असं नाव आहे. त्यामुळे या गाण्याच्या रॉयल्टीसाठी लताला अनेक वर्ष झगडावं लागलं.

* या गाण्याच्या वेळी खेमचंदजी गंभीर आजारी होते. आपला मृत्यू जवळ आला आहे असं त्यांना वाटायचं. रिहर्सलसाठी ते गाडीच्या मागच्या सीटवर झोपून येत असत. त्यांच्या या भावावस्थेमुळे गाण्याला असलेली गूढतेची किनार अधिकच गडद झाली .

* हे गाणं पहिल्यांदा रेडिओ सिलोन वरुन प्रसारित झालं. तेव्हा ‘ही गायिका कोण ?’ असा प्रश्न विचारणा-या पत्रांचा पाऊस रेडिओ सिलोनवर पडला. त्यांनी मुंबईला HMV कडे चौकशी करून गायिकेचं नाव “लता मंगेशकर” असल्याचं जाहीर केलं.

* पुढच्या वर्षी (1950) खेमचंद प्रकाश निधन पावले. त्यांचं वय होतं फक्त 43. त्यांना मूलबाळ नव्हतं . एका अनाथ मुलीला त्यांच्या पत्नीने सांभाळले होते व तिला स्वतःची मुलगी मानले होते . तिचे लग्न करुन दिले . मात्र शेवटची काही वर्षे खेमचंदजींच्या पत्नीला विपन्नावस्था आली. काही दिवस रेल्वे स्टेशनवर भीक मागून काढावी लागली. कालांतराने, Indian Performance Right Society ही संस्था, गायक व संगीतकार यांची जी गाणी रेडिओवर वाजतात त्याची राॅयल्टी वसूल करू लागली. “आएगा आनेवाला” या गाण्याच्या रॉयल्टीपोटी तब्बल 50 लाख रुपये बँकेत जमा झाले . परंतु खेमचंद प्रकाश यांना कोणीही वारस नसल्यामुळे ते तसेच पडून राहिले . त्यांच्या मानलेल्या मुलीचेही निधन झाले होते . 2001 च्या सुमारास तिच्या मुलाने ( कथ्थक शैलीचे प्रसिद्ध डान्सर राजकुमार झाबरा ) या 50 लाखासाठी कोर्टात दावा लावला . ( त्याचे पुढे काय झाले ते माहिती नाही)

* आणि या गाण्याबाबतचा हा सुप्रसिद्ध किस्सा : वर्ष 1949. उस्ताद बडे गुलाम अली खाँ साहेब आपले स्वरमंडल जुळवीत बसले होते. अचानक घरातल्या कोणीतरी ग्रामोफोनवर एक रेकॉर्ड लावली. आएगा आनेवालाचा पहिला भाग – खामोश है सितारे चुपचाप है जमाना

सर्वसाधारणत: आेळीची सुरुवात करताना गायकाला एखाद्या वाद्यावर सूर दिला जातो व मग गायक आपला स्वर त्यात मिसळतो.

परंतु इथे उलटाच प्रकार होता. लता प्रत्येक आेळीची सुरुवात कोणत्याही आधाराविना करत होती व मग वाद्ये त्यात आपले स्वर मिसळत होती. आणि तरीही स्वर संपूर्णपणे निर्दोष होते .

खाँ साहेब अवाक झाले. त्यांनी स्वरमंडल बाजूला ठेवले. वारंवार ती रेकॉर्ड त्यांनी एेकली आणि चकीत होऊन उद्गारले.. ” ये ससुरी तो कभी बेसुरी होती ही नहीं ”

या गाण्याने लता masses मध्ये लोकप्रिय झाली व classes मध्ये मान्यता पावली .

माहिती संकलन : धनंजय कुरणे
9325290079

Avatar
About धनंजय कुरणे 6 Articles
धनंजय कुरणे हे कोल्हापूर येथील व्यावसायिक असून ते संगीतविषयक विपुल लेखन करतात. ते कोल्हापूरमध्ये Music Listeners Club चालवतात. त्यांच्याकडे रेकॉर्डसचा मोठा संग्रह आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..