आकाशातील चंद्र एकदा अचानक लपूनच बसला
वेड्यासारखा मी त्याला रात्रभर शोधला
एका रात्री अचानक चंद्र मला खिडकीतून दिसला
माझ्याकडे पाहत खुळा गालात गोड हसला
कित्येक रात्री त्याने न चुकताच अंगरखा बदलला
सुंदर मुखड्यावरील डाग मात्र नाही लपविला
माझ्यासाठी तो तर माझा चांदोबा मामा झाला
इतरांसाठी तो तर रात्रीचा सखाच राहिला
आकाशातील चंद्र एकदा तर माझ्या स्वप्नात आला
कानात माझ्या गोड अंगाई गाऊन गेला
कवी – निलेश बामणे
Leave a Reply