आकाश सारे झाले मोकळे
सप्तरंगास स्पर्शुनी दुर पळे,
सप्तरंगांच्या त्या इंद्रधनुवरती
छाया शितल शोभे तयावरी,
मेघांच्या धारा बरसुनी जाती
ढ़गांतुनी त्या फुलावरती,
स्पर्श तयांचा जेंव्हा होई फुलास
बहरती ते जणु करुनी मधुपाश,
नकळत मेघ सारे पळोनी जाती
फुल बिचारे मनी कोमेजती.
— प्रमोद पाटील
Leave a Reply