‘गृहिणी गृहमुच्यते’ अशी घराची व्याख्या केली जाते. ज्या ठिकाणी सर्व व्यक्तींना सांभाळायला, वाढवायला समर्थ अशी स्त्री आहे तिथंच घरपण असतं. कालच महिला दिन झाला .पोषणम शिक्षण आणि रक्षण अशा सर्वच जबाबदाऱ्या प्रत्येक गृहिणीला पार पाडाव्या लागतात. त्यातील आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पाडणं तर चालू काळात फारच कठीण होत चालले आहे. आजीबाईचा बटवा ही शोभेची वस्तू नाही. या बटव्यातील चिजांची नीट माहिती करून न घेता बटव्याचा योग्य उपयोग करता येणार नाही. म्हणूनच प्रत्येक गृहिणीनं वरचेवर आढळणाऱ्या रोगांसंबंधी तक्रारींसंबंधी थोडीशी माहिती मिळविली पाहिजे. ‘ताप येणे’ ही अवस्था ! बहुसंख्य गृहिणी ‘अंग गरम वाटतं, ताप पाहिला नाही’ असं सांगतात. प्रत्येक घरात एक थर्मामीटर असणे आवश्यक आहे. कुणाचाही ताप, तो दर चार तासांनी मोजून तापाची नोंद करावी. केवळ तापाचा चढ उतार लक्षात घेऊन ताप टायफॉईडचा आहे, मलेरिआचा आहे किंवा अन्य कोणत्या प्रकारचा आहे हे डॉक्टर बरेचदा ओळ्खू शकतात.
त्रिभुवन कीर्ती हे त्याच्या नावाप्रमाणेच तापावरील एक अत्यंत उपयोगी औषध म्हणून कीर्ती मिळवून आहे. लहान मुलांना त्रिभुवन कीर्तीची पूड देण्यापेक्षा मधात उगाळूनमात्रा द्यावी. इतरांना २ ते ३ गोळ्या दिवसातून ३ वेळा पाण्यातून द्याव्या. विशेषतः सर्दी अंगदुखी किंवा फ्ल्यू ची लक्षणे असतील तर तुळशीच्या रसातून औषध द्यावं. चंद्रकला हेही तापावरील एक गुणकारी औषध. विशेषतः ताप १०३-१०४ फॅ. असा तीव्र असेल किंवा तापाबरोबर अंगाची लाही लाही होणं, डोळ्यांची आग होणं, चेहेरा लालबुंद होणं अशा तक्रारी असतील तर १ ते २ गोळ्या दिवसातून ४ वेळा द्याव्या. गुळवेल सत्त्व या वनस्पतीचं पर्यायी नाव अमृता आहे. खूप दिवस येणाऱ्या तापामध्ये, बरेचदा नेमके कारणही कळत नाही. शरीरात उष्णता कडकी वाढली असं म्हटलं जातं. अशा वेळी गुळवेल सत्त्व खूप दिवस पोटात द्यावे. किंवा गुळवेलीचा काढा द्यावा. ‘संशमनी वटी’ नावाच्या गोळ्याही मिळतात.
याहीपेक्षा तापावरील घरगुती उपचार म्हणजे विडा ! कडुनिंब, तुअळस व बेल यांची प्रत्येकी ७, ७ पाने घालून विडा तयार करावा व तो रोग्यास चावून चावून खाण्यास सांगावा. चव कडू लागते पण म्हणून त्यात साखर घालू नये. याच काढाही करून देतात. महिनेन महिने नवनवीन अँटिबॉयॉटिक्स-कॉर्टिझोन्स तपासण्या या आधुनिक पद्धतीनं बेजार झालेल्यांना तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही.
विशेषतः मलेरियावर तर नुसत्या, कडूनिंबाचा विडा ३ दिवस थंडी वाजून ताप आला असता खाण्यास द्यावा. तापाचा प्रकार कोणताही असला तरी रोग्यास तांदुळाची पातळ पेज, तूप,मीठ, मेतकूट असा हलका आहार जरूर द्यावा. रोग्याला थर्मामीटर, शेकण्याची पिशवी, सहाण, लहान खलबत्ता, कात्री, कापूस, बँडेज, चिकटपट्टी व गृहिणीने आपल्याला ज्याची चांगली माहिती आहे अशी १५ ते २० औषधे. या बटव्यात असली पाहिजेत. सर्वांनी हे समजूनं घेतले पाहिजे की आपण जे वापरणार व ज्या तक्रारीसाठी वापरणार त्या दोन्ही गोष्टींची माहिती स्वतः करून घेतली पाहिजे. यादृष्टीनं गृहिणीनं पुढील पुस्तके संग्रही ठेवावीत.
आयुर्वेदीय औषधी गुणधर्मशास्त्र : वैद्य. पं. गंगाधरशास्त्री गुणे.
नित्योपयोगी निवडक औषधे : श्री. म. गो. मोडक.
गृहवैद्य : लेखक डॉ. र. कृ. गर्दे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply