नवीन लेखन...

…आणि बिरबल परतला

अकबर आणि बिरबल यांच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. अकबर बादशहा असूनही बिरबलची आणि त्याची खूप चांगली मैत्री होती. अनेकदा बिरबलबरोबरच्या सहवासात आपण बादशहा आहोत हे अकबर विसरून जात असे. त्यामुळे दरबारातील अनेक मंडळींना उभयतांची ही मैत्री खटकायची. बिरबलला अकबरपासून कसे दूर करता येईल यासाठी काही जणांचे सारखे प्रयत्न चालू असत.

एकदा असेच कोणीतरी बिरबलबद्दल अकबर बादशहाचे कान भरले. अकबर बिरबलवर नाराज झाला. एका किरकोळ गोष्टीवरून दोघांत वाद झाला. हा वाद विकोपास गेला व अकबर बादशहाने कसलाही न विचार करता बिरबलला दरबार सोडून जाण्याचा आदेश दिला. अपमान झाल्यामुळे बिरबलही राजधानी दिल्ली सोडून एका जवळच्या खेडेगावात निघून गेला.

तेथे त्याने एका गरीब शेतकऱ्याकडे आपला मुक्काम ठोकला. मात्र कोणालाच आपण या गावात आलो आहोत, हे कळू दिले नाही. काही दिवसांनी अकबर आपला राग विसरला त्यामुळे बिरबलशिवाय त्याला चैन पडेना. तो अस्वस्थ झाला. त्याने बिरबलला बोलावून आणण्याचा सैनिकांना आदेश दिला. परंतु बिरबल कोणालाच सापडेना. बिरबल असा तसा सापडणार नाही व तो येणारही नाही, याची अकबरला कल्पना होती.

त्याने मग एक युक्ती केली व राजधानीत दवंटी पिटवली, की जो कोणी एकाच वेळी अर्धा उन्हातून व अर्धा सावलीतून राजवाड्यात येईल त्याला पाच हजार सुवर्णमुद्रा मिळतील. बिरबल ज्या शेतकऱ्याकडे राहत होता तो फारच गरीब होता. त्याची गरिबी दूर करण्यासाठी ही फार चांगली सुवर्णसंधी आहे, हे बिरबलाने ओळखले. त्याने त्या शेतकऱ्याला एक बाजले डोक्यावर ठेवून दिल्लीला पाठवले व राजवाड्यात जायला सांगितले. त्याप्रमाणे तो शेतकरी डोक्यावर बाजले घेऊन राजवाड्यात आला. त्याने पैज जिंकली होती. त्यामुळे त्याला अकबर बादशहाने पाच हजार सुवर्णमुद्रा दिल्या व तू कोणाच्या सांगण्यावरून तेथे आलास, हे विचारले. शेतकऱ्याने त्याच्याकडे मुक्कामास आलेल्या पाहुण्याच्या सांगण्यावरून आपण येथे आलो असल्याचे सांगितले.

अकबराने तत्काळ तो बिरबलच असावा हे ओळखले व तो स्वत: शेतकऱ्याबरोबर त्याच्या गावी गेला व बिरबलला त्याने सन्मानाने दरबारात परत आणले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..