नवीन लेखन...

आतल्या वर्तुळातून

“साहेब हा आमच्या पक्ष कार्यालयाच्या आत बाहेर संशयास्पदरित्या फिरताना आढळला म्हणून तुमच्याकडे आणलाय याला.” दोन कार्यकर्ते एका भेदरलेल्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये घेऊन आले होते.

इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला अपादमस्तक न्याहाळले, आणि तो एक निरुपद्रवी सामान्य माणूस आहे, हे त्यांनी ताडले.

इन्स्पेक्टर : “काय रे, का फिरत होतास तू यांच्या कार्यालयात?”

सामान्य माणूस : “काही नाही साहेब, मी केवळ कुतूहलापोटी तेथे गेलो होतो.”

इन्स्पेक्टर : “असं, कसलं कुतूहल?”

सामान्य माणूस : “साहेब, मी सामान्य माणूस आहे, दररोज पेपर वाचतो, त्यातील बातम्यात नेहमी उल्लेख केले जाणारे,’राजकीय वर्तुळ, आतले वर्तुळ, अधिकृत सूत्र, आतला गोट याच्याबद्दल मला कुतूहल आहे.”

इन्स्पेक्टर :”बर मग काय करत होतास तू तिथे?”

सामान्य माणूस : “साहेब, मला पहायचं होतं की, हे राजकीय वर्तुळ कुठे आखलेलं असतं? त्याच्या आतील भागात असलेल्या त्या आतल्या वर्तुळातून बाहेरचं जग कसं दिसतं? अधिकृत सूत्र म्हणजे लहान दोरा असतो की मोठी दोरी? आणि आतला गोट म्हणजे कसा असतो? जाडजूड का कसा? कारण मला शिंपी लोक कपड्यांना गोट लावतात तेवढाच माहित आहे.”

यावर इन्स्पेक्टर साहेब व त्या दोन कार्यकर्त्यांनी कपाळावर हात मारून घेतला नसता तरच नवल!

— रमण कारंजकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..