मराठी सृष्टीच्या कोट्यवधी वाचकांना माझा नमस्कार. अगदी विनामूल्य करून दिलेल्या अनमोल सेवेबद्दल मराठी सृष्टीच्या संंचालकांचे प्रथमतः आभार. या साईट्सवर हा माझा पहिलाच लेख.
आज माणूस सुखाचा कुठे -कुठे शोध घेत नाही? त्यातल्या त्यात युवक-युवतींचा सुखासाठी सातत्याने शोध सुरू असतो. मात्र सुख आणि दुःखाचे खरे स्वरूप
काय आहे, माणसाचा या सृष्टीवर येण्याचा हेतू काय, त्याला येथे येण्यासाठी कोण बाध्य करते, तो कुठून आला, कुठे जाणार या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याऐवजी मनुष्य वेगळ्या वाटेने सुख आणि दुःखाचा शोध घेत आहे. निर्धन व्यक्तीला वाटते, श्रीमंत खरे सुख आहे. त्यामुळे तो या ना त्या मार्गाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतो. परिणामी समाजात भ्रष्टाचार वाढीस लागतो. श्रीमंत झाल्यावर आणखी श्रीमंतीची हाव सुटल्याने तो आणखी लबाडी करण्यास सुरूवात करतो. श्रीमंत झाल्यावर पैशांच्या जोरावर तो मांस-मदीरा आणि मदीराक्षी या चैनीकडे वळतो. अविवाहित असलेला लग्नात सुख शोधत आहे, लग्न झालेला कुटुंबियांच्या सततच्या मागण्यांमुळे वैतागून संन्याशाच्या जीवनाकडे आकर्षित होत आहे. काय आहे सुखाचे स्वरूप, हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतो आहे. मी कोण आहे, कोठून आलो, माझे खरे स्वरूप काय या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे काम ज्या श्रीमद्भगवद्गीता, श्रीमद्भगवद् भागवतम, वेद-उपनिषद आदी पवित्र ग्रंथांनी केले, त्या ग्रंथांचा आधार घेण्याची खरी वेळ आज येऊन ठेपली आहे. या सर्वच वैदिक ग्रंथांच्या मतानुसार आपण शरीरधारी व्यक्ती नसून जीवात्मे आहोत आणि सर्वोच्च नियंत्रक भगवान श्रीकृष्णांच्या आदेशाने आणि गतजन्मात केलेल्या चांगल्या-वाईट कर्मांचा परिणाम म्हणून या भौतिक सृष्टीत मनुष्याचे पदार्पण होते. मनुष्य चांगला किंवा वाईट किंवा थोडा चांगला थ ोडा वाईट होण्यास सृष्टीनिर्मात्याचे बहिरंगा शक्तीमध्ये असलेले सत्व, रज आणि तम हे त्रिगुण कारणीभूत आहेत. या तीन गुणांची अस्तित्वासाठी एकमेकांवर सतत कुरघोड्या चालूू असतात. त्यामुळे माणूस दिवसाचे चोवीस तास
ांगला किंवा चोवीस तास वाईट नसतो, याचा प्रत्यय नेहमी येतो. मनुष्य जीवनात संसार सुखाचा उपभोग घेत असतानाच सृष्टीच्या सर्वोच्च नियंंत्रक भगवान श्रीकष्णांना शरण जाऊन त्यांची भक्ती करा आणि जन्म-मृत्यूच्या संसार सागरानातून ही निरर्थक भ्रमंती थांबवा, असे आवाहन वैदिक ग्रंथ आपणाला करीत आहेत. सर्व प्रकारचे भोगैश्वर्य आणि आर्थिकदृष्ट्या अमाप श्रीमंतीने नखशिखांत भरलेल्या महासत्ता अमेरिकेत कशाची कमी आहे काय? मात्र तेथेही खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी पायपीट चालू आहे. केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथून यासाठी तर डुकरे जगतात. आपण जीवात्मे असून या सृष्टीत भगवान श्रीकृष्णांना अनन्यभावे शरण जाऊन त्यांच्या भक्तीद्वारे आपल्या खर्या घरी अर्थात परमधामात जाणे, हाच आपला येथे येण्याचा हेतू असून ज्या त्रिगुणांमुळे आपण येथे येतो, त्या त्रिगुणांवर भगवतांच्या कृपेने आपण सहज मात करू शकतो. मात्र त्यासाठी लीन, नम्र होऊन श्रीकृष्णांना शरण जाणे यातच आपले हित सामावलेले आहे.
— बालकृष्णदास
Leave a Reply