१
परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं
प्रभू भेटावा एके दिनीं ।।
करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता
केली शरीरा करीता ।।
जिंकू वा मरुं ही जिद्द
करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा
बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।
इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव
जाणले इतर मनाचे ठाव ।।
दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पूजेत जाई वेळ
ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।
प्रभू चिंतनांत जाई वेळ
वाट बघतो निरोपाची
ओढ फक्त जगदंबेची ।।
खंत येवून मन विचारे
कां न प्रभू भेटला ?
ह्याची रुख रुख मनाला ।।
२
आत्मचिंतन करिता
जाणले मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार
कर्म करी त्यास साकार ।।
ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण
हीच ईश्वरी खूण ।।
ईश्वरप्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत
‘ आनंद ‘ हाच भगवंत ।।
Leave a Reply