आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो…
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात ‘कॅटेगरी’वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण गावात साळी माळी धनगर वंजारी असतो, निवडणुकीत फक्त एक मतदार असतो, आणि दंगलीत दगड उचलणारा माथेफिरू असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण फक्त सैनिक मेल्यावरच् आपण “भारतीय” होतो…
… फक्त दोन मिनिटांसाठी !!
*फ़क्त वाचु नका…!
विचारही करा….!!*
Leave a Reply