यकृत हे आपल्या शरीरातील वर्कहाऊस आहे. ते अन्नातील चरबी आणि कर्बोदकांना पचण्यायोग्य बनवते. हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. यकृत शरीरातील विषारी घटकांना बाहेर काढून टाकण्याचे काम करते. शरीराला आवश्यक प्रथिने इथे तयार केली जातात आणि पचनक्रियेसाठी आवश्यक असणारा पित्तस्रावदेखील यकृतामधूनच स्रवतो. यकृताची अशी अनेक कामे असतात, म्हणूनच यकृतामधील बिघाडामुळे अनेक समस्या निर्माण होतात.
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही यकृताला इजा पोहोचू शकते. यकृताशी संबंधित समस्या : यकृताच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. त्यांना ए, बी, सी, डी आणि ई अशा नावांनी ओळखले जाते. ए आणि ई यांना सामान्य भाषेत जॉन्डिस किंवा कावीळ या नावाने ओळखले जाते. दूषित पाण्यामुळे कावीळ होते. बी, सी आणि डी हे प्रकार संसर्गामुळे होऊ शकतात. यामुळे यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. वेळीच लक्षणे ओळखली नाही तर यकृत निकामी होण्याची शक्यता असते. याला क्रॉनिक हिपॅटायटिस म्हटले जाते. शिवाय ऑटोइम्युन डिसॉर्डर आहे, जो विशेषतः स्त्रियांमध्ये आढळतो.
कावीळ, यकृताचा कॅन्सर आणि हिपॅटायटिस हे यकृताशी संबंधित आजार आहेत. यकृताच्या समस्या ह्या बहुतांश अस्वच्छतेमुळेच उद्भवतात. हिपॅटायटिस ए आणि ई हे दूषित पाणी आणि अस्वच्छ अन्नामुळे होतात. हिपॅटायटिस बी, सी व डी हे असुरक्षित लैंगिक संबंध आणि संक्रमित रक्ताद्वारे होतो. जास्त मद्यपान यकृत आणि स्वादूपिंडाला इजा पोहोचवते. एकदा त्रास होऊनही मद्यपान बंद न केल्यास यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते.
या लक्षणांकडे बघा
* त्वचा, नखे आणि डोळे पिवळे होणेे. पित्ताचे प्रमाण वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात. कधीकधी लघवी पिवळी होणे.
* यकृत खराब झाल्याने पित्त उचंबळून तोंडात येऊ शकते. ज्यामुळे तोंड कडवट राहते.
* सतत भीती वाटणे आणि उलटी होणे. शरीरातील पित्त वाढल्याने अशी लक्षणे दिसून येतात.
* पोटामध्ये सूज येणे आणि सतत जडपणा राहणे.
* सतत गोंधळलेल्या अवस्थेत राहणे आणि वस्तू विसरणे.
* दारूच नव्हे तर अधिक मीठदेखील हानीकारक ठरते.
* मीठामुळे केवळ उच्च रक्तदाबाचा त्रास होतो, असे नव्हे. यामुळे यकृतालाही इजा पोहोचू शकते. यूएसमध्ये उंदरांवर केलेल्या एका प्रयोगानुसार मीठाच्या अतिसेवनामुळे यकृतामध्ये काही बदल झाल्याचे आढळून आले. पेशींचा प्रसार न होणे यासारखे परिणाम दिसून आले. मीठाच्या अतिरिक्त सेवनामुळे पेशींची निर्मिती होताच त्या नष्ट होतात. यातूनच लिवर फायब्रोसिस यासारखी समस्या निर्माण होते. मीठाच्या अतिरिक्त परिणामांना कमी करण्यासाठी क जीवनसत्त्वाचे भरपूर सेवन करण्यावर भर द्यायला हवा.
स्थूलपणाची समस्या मिलान विद्यापीठामध्ये 323 रुग्णांवर केलेल्या संशोधनानुसार असे आढळून आले की ज्यांच्या शरीराचा खालचा भाग जड असतो, त्यांना नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीजचा त्रास असतो. एनएएफएसडी ही एक अशी स्थिती आहे, ज्यामध्ये यकृताचा आकार वाढतो. ज्या व्यक्तींची कंबर ही 36 ते 40 इंच एवढी होती, त्यांच्यामध्ये फॅटी लिव्हरची समस्या दिसून आली.
जास्त वेळ बसून राहणे : एकाच ठिकाणी तासन्तास बसल्यानेही एनएएफएसडीचा त्रास होऊ शकतो. दक्षिण कोरियामध्ये एकाच ठिकाणी बसून काम करणार्या् 1,40,000 व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये 40,000 व्यक्तींना लिव्हरचा त्रास होता. ब्रिटनच्या युकेमध्ये न्यू कॅस्ले विद्यापीठातील प्राध्यापक मायकल आय टर्नेल यांच्या मते आपल्या शरीराची ठेवणच अशी आहे की, शरीर निरोगी राहण्यासाठी त्याला सक्रिय ठेवणे गरजेचे आहे. आपल्या हालचाली मर्यादित असतील तर यकृताचा त्रास हमखास उद्भवणार.
जीवनशैली सुधारा : मद्यपान टाळा. नियमित मद्यपान करणार्याह एक चतुर्थांश लोकांना यकृताची समस्या भेडसावते. धूम्रपानामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
* मनाने औषधे घेणे टाळा. चुकीच्या औषधांचा यकृतावर वाईट परिणाम होतो. स्वतःहून आयबुप्रोफेन, अॅळस्परिन यासारखी औषधे घेणे टाळा.
* स्थुलतेमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. वजनावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम करा आणि स्थूलता वाढेल, असा आहार वर्ज्य करा.
* अतिप्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन करणे टाळा.
* ३५ वर्षांनंतर एकदा यकृताची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. यकृतामध्ये एलानाईन आणि एस्पारटेट यांसारखी एंझाइम्सचा स्तर वाढणे धोक्याचे ठरू शकते.
* हिपॅटायटिस ए आणि बीच्या औषधांची पूर्ण मात्रा घ्या. हिपॅटायटिस सी आणि ई वरील औषधे अजून उपलब्ध नाहीत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
निरोगी यकृतासाठी योग्य आहार
यकृतामध्ये साचलेल्या मेदामुळे आतड्यांच्या आजारांचाही धोका वाढतो. शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे आहे. निरोगी यकृतासाठी आहारामध्ये ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे.
* शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकण्यासाठी प्रोबायोटिक्सची जास्त मदत होते. मध, दही, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा आहारात जरूर समावेश असावा. बाजारामध्ये प्रोबायोटिक्सयुक्त ब्रेड, दूध आणि दही तसेच सप्लिमेंट्सदेखील मिळतात.
* ब आणि क जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन वाढवा. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. शरीरावर विषद्रव्यांचा होणारा परिणामही कमी होतो. ब जीवनसत्त्व यकृताला सदृढ ठेवते.
* सकाळच्या नाष्ट्यामध्ये स्थूलता वाढवणारे पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.
* मोड आलेल्या कडधान्यांचा आहारामध्ये समावेश करावा.
* कच्ची फळे व भाज्या खाल्ल्याने यकृताला चांगला फायदा होतो. विशेषतः हिरवे, नारंगी, पिवळे, जांभळे आणि लाल रंगांची फळे आणि भाज्या खाल्ल्याने फायदा होतो. गाजर, मुळा, चाकवत या भाज्या यकृतासाठी चांगल्या असतात.
* भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल सरबत आणि ज्यूस या पेयांचे सेवन करायला हवे. अशा पेयांमुळे यकृताची ताकद वाढते.
* यकृतामध्ये तयार होणार्याि पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीत जास्त कडवट चवीची पाने खाल्ली पाहिजेत. भाज्यांचे सॅलड खाऊ शकता. कारल्यामुळेही फायदा होतो.
* मासे, शेंगदाणे, सूर्यफूल, बदाम, तीळ इत्यांदीचा आहारामध्ये समावेश करा. सीताफळाच्या बिया, फळभाज्या, वाटाणे, डाळ आणि कडधान्ये यांचे आहारातील प्रमाण वाढवा.
* दररोज 5-6 ग्रॅम बडिशेप खा.
* हळदीमुळे शरीरातील विषद्रव्ये वाढवणार्याप पदार्थांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
* काळी मिरी खाल्ल्याने अॅरसिडिटीचा त्रास कमी होतो. अॅरसिडिटीमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. रामदास जाधव
Leave a Reply