काही दिवसापूर्वी दिर्घ आजारपणामुळे आमच्या आजीचे वयाच्या जवळ-पासपंच्याहत्तराव्या वर्षी निधन झाले. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे आमची आई तिचे मायेचे छ्त्र कायमचेच गमावून बसली. आमच्यासाठी तर ती मायेच मोकळ आभाळ्च होती. आमच्या आजीच्या मृत्यूमुळे एका पिढीचा अस्त झाला आणि एक पिढी अधिक प्रोढ झाली. मागच्यासात-आठ वर्षापासून आजी आजारी होती. तिच्या आजारपणात आमच्या आईने तिचे कर्तव्य पालनकरण्यात जरा ही ह्लगर्जीपणा केला नाही. पण एका विवाहीत मुलीला आपल्या आईची काळचीघेण्याला काही मर्यादा येतात. आमच्या आजीच्या काळजीने आमच्या आईची होणारी तगमग मीप्रत्यक्ष पाहिलेय त्यामुळे तिच्या जाण्याने आईच्या आयुष्यात एक कधीही भरून न निघणारीपोकळी निर्माण झालेली आहे हे नक्की. आजीच्या अंतीम समयी तिच्या जवळ नसल्याचे आणित्या काळात तिच्याशी प्रत्यक्ष संवाद साधता न आल्याचे दुःख आईला अधिक त्रस्त करीतहोत. आजीच्या मृतदेहासमोर ओसका-बोसकी रडणार्या आमच्या आईला आंम्ही सावरण्याचाप्रयत्न केला नाही कारण तिच रडून मोकळ होण आमच्यासाठी खूपच महत्वाच होत.
पतीच्या अकाळी मृत्यूनंतर आमच्या आजीने आपल्या तीन मुलांना एकटीने काबाडकष्ट करून लहानाचे मोठे केले. त्यांच्यासाठी योग्य निवार्याची सोय करण्यापासूनत्यांच्या लग्न-कार्यापर्यतच्या सर्व जबाबदार्या तिने उत्त्म रित्या पार पाडल्या.वयाच्या पाचष्ट वर्षापर्यत ती अव्याहत काम करीतच होती. वयोमानाने काम करने थांबले.मधूमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या जुन्याच आजारांनी अधिक डोक वर काढल. दोन-तीनवर्षापूर्वीपासून तिची हालचालही मंदावली त्या ही परिस्थितीत ती सर्वांची अस्थेनेचोकशी करायची. आपल्या आयुष्यात स्वतःजवळकाहीही राखून न ठेवता सर्वांवर प्रेम आनंद्च नव्हे तर पैसा-अडका ही मागचा-पुढचाविचार न करता अगदी सहज उधळ्णार्या माझ्या आजीच्या वाट्याला तिच्या जीवनाच्या अंतीमकाळात इतक वेदनामय जीवन का आलं असावं हा प्रश्न मला आज तिच्या मृत्यू नंतर हीव्यतीत करीत आहे. आमची आजी तशी आमच्या वाट्याला फारशी कधी आलीच नाही. पण आमच्याआजीच्या येण्याची वाट मात्र आम्ही चातकासारखी पाहायचो.तिने आमच्यासाठी वेळोवेळीआनलेल्या खाऊची चव आजही आमच्या जीभेवर रेंगाळ्ते. आमच्या आजीने आमच्यावर केलेल्या अनंत उपकाराची परतफेड आंम्ही कधीचकेली नाही कारण ती करने शक्यच नव्हत. आमच्या कुटुंब आर्थिक संकटात असताना आमच्याआजीने तिच्या ऐपतीप्रमाणे आम्हाला वेळोवेळी आर्थिक मदत ही केली होती. आमच्यासाठीआमच्या हक्काच आधार स्थान असणार्या आमच्या आजीला ही आधार देण्याची वेळ कधी तरी आमच्यावरयेईल असा विचार आंम्ही स्वप्नातही केला नव्हता.
आमच्या आजीने सर्वांना भरभरून आनंद दिला पणतिच्या अंतीम काळात तिला आनंद उपभोगता आला नाही याचे मला व्यक्तीशः सर्वात जास्तवाईट वाटते. आमच्या आजीचे जाणे आमच्यासाठी अनपेक्षित नव्ह्ते. पण तिच्याजाण्यामुळे मला जे प्रश्न पडले त्या प्रश्नाची मला गवसलेली उत्तरे मला अधिका-अधीकव्यतीत करीत होती. मी एक मुलगा असूनही ठामपणे सांगू शकतो आपल्या म्हातारपणी आपलीकाळ्जी घ्यायला मुलगाच हवा असा विचार करण्यासारखा दुसरा मुर्खपणा नाही. आमच्याआजीच्या मृत्यूनंतर आपले वृद्धत्व आनंदात जावे म्ह्णून कोणती खबरदारी घ्यावी लागेलयावर माझ्यासह सर्वाचेच चिंतन सुरू झाले. माझ्या आजीने कधीच मला कोणतीच गोष्टसांगितली नाही आणि ती सांगण्याची गरजच नव्हती कारण माझ्या गोष्टीतील ती आर्द्श आजीहोती, मला माझ्या आजीची त्यागी वृत्ती नेहमीच अचंबित करीत आली. आज तर तिचा आदर्शडोळ्यासमोर ठेवून तसे वागण्याचा प्रयत्न करणे ही केवळ अशक्य आहे आमच्यासाठी.आमच्या आजीने तिच्या बटव्यातून आंम्हाला जे होत ते सारच काढून दिल. ती गेलीतेंव्हा तिचा बटवा रिकामा होता. तो तसा असायला नको होता. कदाचित त्या बटाव्यातआंम्ही काहीतरी टाकायला विसरलो होतो अथवा कमी पडलो होतो. पण तिच्या आठवणींचा बटवा आजही आमच्याकडे आहे जो कधीच रिकामा होणार नाही…
— निलेश बामणे
Leave a Reply