हल्ली माझ्याही मनात विचार येतो
आपण राजकारणात जावं…
आम आदमी तर आपण आहोतच
मग आम आदमींच्याच पक्षात जावं…
मग आम आदमींच्याच पक्षात जावं…
इतरांच्या पक्षात जावून मी उगाच
त्यांच्या तत्वांनी रंगलेल्या झेंड्यांच वजन का वाहवं…
त्यांच्या तत्वांनी रंगलेल्या झेंड्यांच वजन का वाहवं…
राजकारणातील तत्व इतिहास जमा झाल्यावर
त्या तत्वांसाठी मी मतदान का करत रहावं…
त्या तत्वांसाठी मी मतदान का करत रहावं…
राजकारणात आम आदमीला बाजूला सारून
मी वर्षानुवर्षे खास लोकांच महत्व का वाढवावं…
मी वर्षानुवर्षे खास लोकांच महत्व का वाढवावं…
जर मी आम आदमी आहे तर आम आदमी साठीच
राजकारणात उतरून लढावं…
राजकारणात उतरून लढावं…
कवी- निलेश बामणे.
— निलेश बामणे
Leave a Reply