नवीन लेखन...

आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

अग्निदीपक – भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
अपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक
अवलेह – साखरेचा गुळाचा पातळ पाक.
कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
काढा – काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
कुपथ्य – शरीरास/आरोग्यास अहितकारक
केश्य – केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
चूर्ण – सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
ज्वरघ्न – तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ.
पथ्य – शरीरास/आरोग्यास हितकारक
प्राणिज – प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
पित्तशामक – वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
पित्तहारक – शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
फांट – घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
भस्म – एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
मारण – धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
मूत्रल – शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
रेचक – ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
वटिका – गोळ्या
वांतिकारक – सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
वायुकारक – वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
शोधन – शुद्ध करणे
स्नेहन – वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
स्वरस – अंगरस. ओल्या वनस्पतीस कुटून व फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
स्वेदन – घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
हिम/शीतकषाय – घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
हीनवीर्य – ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध..

संकलन :- श्रीधर कुलकर्णी
ज्ञानामृत मंच

— WhatsApp वरील आरोग्यदूत या ग्रुपवरुन साभार

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..