आरती विंझाईला । ताह्मिणीचे आईला।
सप्रम आनंदाने । पंचारती ओवाळीन ।।धृ।।
आरती विंझाईला ।
तुंची एक परब्रह्य । निर्गुण तुचि साचार ।
उत्पती स्थिती नाश । सर्व तुझाच भास ।।1।।
आरती विंझाईला ।।धृ।।
घेतली अनंत रूपे । भत्त* तारावयासी ।
मारिले राक्षसाशी । खेळ आम्हा दाविशी ।।2।।
आरती विंझाईला ।।धृ।।
ऱ्हमलज्जा बिजरूपे । श्री ऱ्हंकार स्वरूपे ।
अक्राळ विक्राळ सुक्ष्मे । सर्व स्थित्यंत रक्षे ।। 3।।
आरती विंझाईला ।।धृ।।
ताह्मिणीचे तापिणीला । श्री विझाई देवीला ।
गणेश सुत प्रिय भत्त* । चरणी तिचे आसत्त* ।।4।।
आरती विंझाईला ।।धृ।।
गायक – श्री.सुधीर गोरे.
Leave a Reply