भारतीय लष्कराचा मूळ पाया व अंतर्गत गाभा हा ब्रिटीश आर्मीवर आधारलेला आहे. याच ब्रिटिशांकडून १५ जानेवारी १९४९ ला फिल्डमार्शल (तत्कालीन जनरल) के. एम. करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला. यामुळे हा दिन भारतीय लष्कर दरवर्षी ‘आर्मी डे’ म्हणून साजरा करते.
भारतीय लष्कर ही प्रशंसनीय काम केलेली सन्माननीय संस्था आहे व आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्या लष्कराला मान आहे.
भारतीय लष्कराची एक प्रतिमा आहे, ती चांगली आहे, लष्कराची नेहमीच प्रशंसा झालेली असून लष्कराने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करताना आदर्श कामगिरी केलेली आहे,संयुक्त राष्ट्रांच्या शांतिरक्षक सेनेत भारतीय लष्कराची मोठी भूमिका आहे, आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतीय लष्कराच्या कामाची स्तुतीच केली आहे. भारतीय लष्कर हे केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नाही पण या संस्थेकडे एक परिपक्वता व जबाबदारी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply