या पूलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.
ह्या पुलाच्या बांधकामासाठी ज्या तारा लागल्या त्यांची लांबी म्हणजे ७.५ वेळा पृथ्वीचा परीघ मोजण्याएवढे आहे (३००००० कि. मी. )
या पूलाचे बांधकाम १९९८ ला पूर्ण झाले.
पूलाची लांबी १२८२८ फूट इतकी आहे.
जपानमध्ये दरवर्षी वादळे, भूकंप आणि सुनामी येत असतात. या सर्व अडचणींवर मात करून तेथील अभियंत्यांनी अनेक पूल बांधले आहेत. अकाशी काईको ब्रिज हा जगातील सर्वात जास्त लांबीचा आणि सर्वात जास्त उंचीचे मनोरे असणारा पूल आहे. या पूलाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुलाच्या बांधकामात नवे तंत्रज्ञान वापरून तेथील अभियंत्यांनी या लोंबत्या पुलाला ट्रस म्हणजेच रस्त्याला आधार देणार्या त्रिकोणी साखळ्यांनी अधिक बळकट केला आहे. यामुळे पुलाला भक्कम आधार जरी मिळाला तरी अशा प्रकारच्या रचनेतून वारा जोराने वाहू शकतो. त्यावर मात करण्यासाठी अभियंत्यांनी प्रत्येक मनोर्यात ट्यून्ड मास डँपर्स बसवले. हे वार्याच्या विरुद्ध दिशेने हालतात. थोडक्यात वारा ज्या दिशेने पुलाला हालवू शकतो त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच वेगाने हे झोके घेतात. त्यामुळे वार्याचा प्रतिकूल प्रभाव नाहीसा होतो. अशाप्रकारे ताशी १८० मैलाच्या वेगाचे वारे हा पूल सहन करू शकतो.
— धनश्री प्रधान
Leave a Reply