सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य नाही म्हणून जेवलो.
रात्री खूप त्रास झाला. उलट्या झाल्या जुलाब तर किती झाले हे आठवतही नाही. चार वाजे पर्यंत झोप नाही. विकनेस खूप आला होता. डीहायड्रेशनची भिती वाटायला लागली होती. सकाळी साडेसातला काकांना म्हटले मी घरी जातो मला डीहायड्रेशन होण्याची शक्यता वाटतेय. त्यांनी थांबायला सांगितले. आमचेकडील सर्व औषधे हाताशी होतीच तरी अँलोपाथीच्या गोळ्या मागवल्या. पण कोणतेही औषध घेतले नाही. साडेआठला नाष्टा आला. उपीट होते. अगदी थोडे घेतले. आणि प्रत्येक घास खाताना नव्हे तर प्रत्येक घास चावताना एकच विचार करत होतो की या खाण्याचा प्रत्येक कण अन् कण मला एनर्जी देणार आहे. माझा सगळा आजार पुर्ण बरा होणार आहे.
आणि चमत्कार अनुभवला.
कोणतेही औषध न घेता साडेनऊ नंतर जुलाब थांबले होते. साडेदहाला मी इतका फ्रेश होतो की कुणी म्हटले असते तर पुण्याहून कोल्हापूरला बाईकवर जाऊन परत येण्याची तयारी होती. (प्रत्यक्षात जायचा योग आला नाही)
हे कां घडले?
माझ्या मते कारण एकच पाँझीटीव्ह विचार. जे उपीट खाताना मी करत होतो. कारण उपीट हे काही जुलाब थांबायचे औषध नाही, नक्कीच!
हा अनुभव आल्यावर रोजच्या जेवताना, काही खाताना आपण काय विचार करतो? हे निरीक्षण केले. बहूतेक वेळा टीव्ही समोर बसून जेवतो. खाण्यावर लक्ष नसते तर सिरियलस् मध्ये चालू असलेले निगेटीव्ह विचार खाण्यातून कॅरी करत असतो. काय परीणाम होणार?
बस्स ठरवले जेवताना टीव्ही, मोबाईल बंद! पुर्ण लक्ष जेवणाकडे!!
भूषण जोशी
आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..
Leave a Reply