आपण आज बघतो इंग्लिश भाषेचे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे. बरीचशी मंडळी परीस्थिती नसतांना मराठी माध्यमात न टाकता ते आपल्या मुलाला / मुलीला इंग्लिश माध्यमात टाकतात, पण तसे पहिले तर हे काही अतिआवश्यक नाही. मराठी माध्यमात राहून
देखील इंग्लिश चे ज्ञान सुधारता / वाढवता येते. पण त्यासाठी आवश्यक असतात प्रयत्न. लगेच १-२ दिवसात इंग्लिश येत नाही त्यासाठी रोजचा सराव असणे आवश्यक आहे तर काय सराव करायचा.
१) न चुकता रोज कमीत कमी अर्धा तास इंग्लिश प्रोग्राम बघणे / ऐकणे आवश्यक आहे. जर इंग्लिश प्रोग्राम नसेल आवडत तर इंग्लिश बातम्या बघा त्या ऐका, सुरुवातीला काहीही समजणार नाही पण चित्र बघून नेमकी काय बातमी चालू आहे त्याचा अंदाज लावा. इंग्लिश फिल्म्स बघा (चांगली बरका).
२) आठवड्यातून एकदा १ वर्तमान पत्र खरेदी करा पूर्ण आठवडा भर ते वाचून काढा. सुरुवातीला काहीही समजणार नाही पण वाचत राहा कुठल्याही प्रकारचे अर्थ शोधात बसू नका फक्त वाचत राहा. नंतर सराव झाल्यावर असे लक्षात येईल सुरुवातीला आपल्याया वाकायला अडथला यायचा पण आता हळू हळू तो कमी होत चला आहे आणि बरीचशी शब्द पुन्हा पुन्हा येत आहे. हा सराव कमीत कमी ३ महिने सतत चालू ठेवा जास्तीत जास्त वेळ वाचनात घालावा.
३) मग आता वाचनाचा सराव झाल्यानंतर कायम येणारे शब्द दिशानारीत शोध पण मराठी अर्थ बघण्यापेक्षा इंग्लिश अर्थ बघा त्यामुळे शब्दसाठा वाढेल.
४) आता वाचन करतांना हळू हळू वाचा आणि काय त्या ओळीत लिहिले आहे आणि काय त्याचा अर्थ आहे हे जाणण्याचा प्रयत्न करा. लगेच काही हे जमणार नाही पण प्रयत्न चालू ठेवा. हळू हळू सोप्या ओळीचा अर्थ समजू लागेल. पूर्ण कळायला खूप परिश्रम करावे लागतीलच. परिश्रम म्हणजे रोजचा सराव.
५) रोज तुम्ही स्वताशीच बोलता अहो म्हणजे विचार करता पण तो विचार कार्त्ताना इंग्लिश मध्ये करा.
६) जास्तीत जास्त इंग्लिश मध्ये
राहण्याचा प्रयत्न करा. मला इंग्लिश गान काळात नाही अस म्हणू नका इंटरनेट वर संपूर्ण लिहिलेलं कोणताही गान सापडत ते शोध आणि मग ते गान ऐका बघा कशी मजा येते ते वाका वाका गण समजत नाही तर करा सुरुवात
— सचिन सदावर्ते
Leave a Reply