तीन वर्षापूर्वी मी एका इंटरनॅशनल स्कुल मध्ये काम करत होते तेव्हाची गोष्ट आहे.. मी खूप आनंदात होते.. माझी बढती झाली होतो.. ऑफिसमधली बैठी कामे करुन कंटाळा आला होता.. रुक्ष काम असल्यागत वाटायच (ते आहेच).. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर मराठीसाठी शिक्षक म्हणुन कोणाचीच नेमणूक झाली नव्हती.. त्यात
आमची शाळा इंटरनॅशनल.. तिकडे मराठी भाषा माझ्या शिवाय कोणालाच अवगत नव्हती.. मग मराठी शिक्षक म्हणुन माझीच नेमणुक झाली.. मी खुप खुष झाले.. आँफिसच्या त्या रुक्ष कामातून सुटका झाली आणि काहितरी क्रिएटिव्ह करण्याची संधी मिळाली.. पण तरीही दिवसरात्र माझ्या डोक्यात फक्त एकच विषय.. मला शिकवता येईल का? मुलांना नक्की कस शिकवायचं? मग पु.ल. आठवले ते म्हणाले होते शाळेत मराठी अस शिकवतात की त्या बद्दल प्रेम उरत नाही (मला त्यांचे शब्द जसेच्या तसे नाही आठवत पण.. )मग जबाबदारी आणखिन वाढली अस वाटल.. पण मी ठरवलं की मी वेगळ्या पध्द्तीनं शिकवणारं.. तसंही त्या शाळेत शिकवण्याच्या पध्दती खासचं आहेत.. त्याचे विषेश प्रशिक्षणही शिक्षकांना दिले जाते , पण मराठी बाबत अस कुठलचं प्रशिक्षण नव्हतं.. मुळात महाराष्ट्रात मराठी हवे या राज ठाकरे यांनी केलेल्या हट्टाचा हा परिणाम होता.. नाही तर कदाचित मराठी आमच्या शाळेत शिकवलही गेल नसत.. (असो..) तर मग अशा प्रकारे शिकविण्याची संधी मिळाली.. माझा वर्गात शिकवण्याचा पहिला दिवस… इ.७वी… मी मुलांना शिक्षक म्हणून पहिल्यांदाच भेटणार होते.. त्यामूळे अर्थातच उत्सुक होते.. वर्गात गेले तेव्हा दृष्य काहीस वेगळच होत.. मुलं वैतागलेली होती.. ”मराठी.. 🙁 ” अशी त्यांची प्रतिक्रिया.. ”आम्ही फ्रेंच घेणार आहोत आम्हाला मराठी नकोय” अस सरळ मला काही मुलांनी सांगितलं. मी शांतपणे ऐकून घेतलं सगळं.. कुठेतरी मलाही दडपण आलं होतं, मी मुलांना म्हणाले ”बरं ठिक आहे.. आपण मराठी शिकायचे की
नाही हे नंत
बघु.. आपण आधी गप्प मारुयात..” मी सुरु झाले.. पण त्या मुलांची कळी खूलतच नव्हती.. ते बोलत होते पण काहीसा आव आणुन.. मोठ्या मुश्किलीने ते मोकळे झाले.. मग आमची मस्त गट्टी जमुन आली.. मी वर्गात गेल्या गेल्या आमची सगळ्यांची मस्ती सुरु व्हायची.. इतर शिक्षक डोकावून जात की वर्गात शिक्षक नसावा इतका गोंधळ.. पण मग इतरांनाही त्याची सवय झाली… मुलांशी बोलल्यावर मला कळल त्यांना मराठी का शिकायच नाही ते. ऐकुन मला धक्का बसला होता.. मला वर्गातला एक मुलगा म्हणाला ‘माझा ड्राईव्हर मराठीत बोलतो’ तर लगेच दुसरी मुलगी म्हणाली, ‘माझी कामवाली बाई मराठी बोलते’. ‘मराठी ईस चिप लॅन्गुएज.. एवढी खालची लोक मराठी बोलतात’ ही माझ्या विद्यार्थ्यांची मत ऐकून आधी एकेकाला फटकावेसे वाटले .. पण मला माहित होत ही त्यांची मत नाहीत.. मी त्यांच ते डिस्कशन ऐकुन घेतलं आणि त्यांना म्हणाले तुम्हाला माहितेय तुमच्या टिचरची (म्हणजे माझी) मातृभाषा काय आहे? बहुतेक मुलांच्या माना नकारात्मक डोलल्या.. काही जण उगाच सांगायचं म्हणुन गुजराथी मारवाडी बंगाली अस काहीस सांगीतल.. मग मी म्हाणाले नाही तुमचा ड्राईव्हर आणि कामवाली जी भाषा बोलते तीच माझी मातृभाषा.. मुलांना आश्चर्य वाटलं.. आणि अपराधीही.. मग त्यांना मी समजावुन सांगीतलं कोणतीही भाषा असो ती श्रेष्ठचं असते. मला कळतयं की प्रत्येकाला आपलीच भाषा आवडते पण याचा अर्थ अस दुसर्या कुणाचीही भाषा निच वगैरे नसते आणि एखाद्याच्या पेश्यावरुन त्याच्या स्टेटसवरुन भाषा ठरत नसते… मग मी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर वगैरे उदाहरणं दिली.. मुलांना त्यांची चुक उमगली.. आमच्या वर्गात एक मुलगी तर थेट अमेरिकेवरुन भारतात आलेली.. ही मुल ३री ते ७वी ची पण एकालाही मुळाक्षरे आणि बाराखडी येत नव्हती सगळाचं उजेड.. मुळात परिक्षार्थी असलेली ही मुलं भाषेची गोडी यांना समजलीच नव्हती.. मग काय.. मी निरनिराळे
प्रयोग सुरु केले.. हे सगळ मजेच्यां स्वरुपात (त्यांच्या मते) चालु होतं.. मी मुलांना कधीच सांगितलं नाही मी त्यांना शिकवतेय.. मी त्यांन पहिल्यांदा गाणी म्हणायला सांगितली.. पण प्रत्येकाने शक्यतो आपापल्या मातृभाषेत गायला सांगितले.. मग माझी वेळ आली.. मी त्यांच्यासाठी ”ससा रे ससा कापुस जसा गायले..” मुलांना फार आवडलं गाणं मग हळूहळू त्यांना ससा म्हणजे काय वैगेरे सांगायला सुरवात केली.. त्यांना ही गोष्ट ठाऊक होतीचइ .. मग हळु हळु अशा गाण्यातून आणि गोष्टीतून त्यांचा शब्दकोष वाढत चालला.. दुसरीकडे मला त्यांच्या बाराखडीकडे लक्ष द्यायचं होतं.. तेही त्यांन कळू न देता कारण ७वीतल्या विद्यार्थ्याना बाराखडी नुसती गिरवायला लावायाची म्हणजे त्यांच्यासाठी कंटाळवाणे.. मग मी युक्ती लढवली.. माझ्या नाटकाची एक एक्झरसाईज् आठवली.. मी फळ्या वर ‘क’ काढला.. मुलांना विचारले हे काय आहे? वर्गात एकालाही लवकर ओळखता आला नाही.. मग मीच सांगितल की हा आहे ‘क’.. आता आपण एक गेम खेळू यात” .. मग मी फ़ळ्यावर लिहीले.. कंक कंकण कंकई कंकईला.. आणि उच्चार करुन दाखवला.. आता मी अनुक्रमे प्रत्येकाकडुन हे म्हणुन घेत होते.. काहींची बोबडी वळत होती.. काहींना लाज वाटत होती.. पण नंतर सगळ्यांनाच त्याची मजा वाटु लागली.. मग हे रागात.. रडत हसत..लाजत.. मोठ्यांदा हसत.. अशा वेगवेगळ्या एक्सप्रेशन मध्ये त्यांच्या कडून म्हणुन घेतलं… त्यांचा ‘क’ कच्चा न राहता एतका मस्तपैकी पक्का झाला, तेही हसत खेळत.. मग क ख ग.. करत बाराखडी पुर्ण झाली.. सोबत उच्चारही अस्खलीत.. एव्हाना मुलांची मस्त मैत्रिण झाले होते मी..ते पण त्यांची सुख-दुःख ते माझ्याबरोबर वाटत होते.. ५वीतल्या एका मुलाने तर मला
मस्त कॉन्मल्पीमेंट दिली.. निकुंज सरांची.. 🙂 मुलांना बारखडी न अडखळता
लिहिता आणि म्हणता आली होती तेव्हा.. त्यांना आणि त्यांच्या पेक्षा मला जास्त आनंद झाला होता.. पण कुण
स ठाऊक काय नजर लागली? ऑफिसमधल्या राजकारणामुळे.. माझ्या कडून शिक्षकपद काढून घेतल.. आणि वरकढनी सांगितल ”रेग्युलर टिचर नाही होऊ शकत तू पण सबस्टिट्युट टिचर म्हणुन तू आहेस..”खूप वाईट वाटल होत मला.. नवीन शिक्षिका वर्गात जेव्हा गेली तेव्हा कित्येक दिवस मुलं हिरमुसून बसलेली असायची.. मी तर मुलांच्या समोर जाणं टाळायचे.. समोर आली की हात पकडुन ठेवायचे आणि विचारत राहयचे तुम्ही का नाही येत.. मी शुन्य नजरेने त्यांच्याकडे बघायचे.. काही सुचायचं नाही बोलायला.. इतकचं म्हणायचे नविन टिचरही छान आहेत.. त्यांच ऐकत जा.. पण मुलं हट्टने हात सोडायची नाहीत.. एकदा शेवटी त्यांच्यावर ओरडले.. मनात नसताना.. सारखं विचारत जाऊ नका… 🙁 आणि कसंबसं तिकडून निघुन आले होते..मध्ये तीन महिन्यांचा काळ लोटला मग मुलांना आणि मलाही सवय झाली.. सत्य कुठेतरी आम्ही स्विकारलं अस वाटत होत.. पण एके दिवशी ३रीतल्या निमेषने परत विचारलं.. तुम्ही केव्हा येणार शिकवायला म्हणुन.. तेव्हा परत त्या प्रश्नाने मन हेलावलं होतं.. उत्तरादाखल मी फक्त कशीनुशी हसले होते..
— स्नेहा जैन
Leave a Reply