आता काही दिवसापूर्वीच बुक गंगा डॉट कॉमवर माझा ‘माझी लेखणी आणि तिचे पंख’ हा 6 वा कवितासंग्रह ई-बुक स्वरूपात प्रकाशित झाला. माझे पहिले दोन कवितासंग्रह ‘प्रतिभा आणि कवितेचा कवी’ पुस्तक रूपात प्रकाशित झालेले होते. ते कवितासंग्रह आजही कित्येक वाचक माझ्याकडे स्वतःहून वाचायला मागतात. त्या कवितासंग्रहातील कविता उत्तमच होत्या पण त्यानंतर मी लिह्लेल्या कविता वास्तववादी, अधिक प्रगल्ब आणि सामाजिक जाणिव जपणारया आहेत. पण त्या कविता पुस्तक रूपात प्रकाशित न झाल्यामुळे वाचकांना आजही माझे ते दोन कवितासंग्रहच माहीत आहेत. आता माझ्याजवळ असणार्या त्या कवितासंग्रहाच्या प्रतीही संपत आल्या आहेत. सध्या त्या पुस्तकांची दुसरी आवृत्ती प्रकाशित करणे मला आर्थिकदृष्टया परवडणार नाही. ते दोन कवितासंग्रह प्रकाशित करण्यासाठी त्यावेळी मला प्रत्येकी दहा हजाराच्या आस-पास खर्च आला होता पण तेंव्हा पेपर वगैरेचा खर्च कमी होता आता सर्वच महागले आहे. आजचा मराठी वाचक बाजारात विक्रीसाठी येणार प्रत्येक पुस्तक विकत घेऊन वाचतोच अस नाही. मराठी वाचकांना प्रसिद्ध, प्रसिद्धी करणार्या अथवा प्रसिद्धीस येत असणार्या लेखक आणि कविंची पुस्तके वाचायला आवडतात. एखादया नवीन लेखकाच्या एखादया कादंबरीवर एखादी नवीन कलाकृती निर्माण झाली आणि तिला प्रसिद्धी मिळाली की आमचे वाचक ते पुस्तक आवर्जून विकत घेऊन वाचतात. नवोदित लेखकांचे उत्तम साहित्यही त्यामुळे वर्षानुवर्षे धुळ खात पडलेले असते. मला तर असे कित्येक नवोदित कवी भेटलेत जे गेली दहा वर्षे कविता लिहता आहेत कवितांनी त्यांच्या कित्येक वहया भरल्यात पण त्यांच्या एकाही कवितेला प्रकाशित होण्याच भाग्य लाभलेल नाही. मी माझ्या कविता वाचकांपर्यत पोहचाव्यात म्ह्णून प्रारंभीच नफ्या- तोट्याचा विचार न करता स्वखर्चाने पुस्तक प्रकाशित करण याचा निर्णय घेतला त्या कामी माझ्या प्रकाशक मित्राने मला मदत केली, लेखनातून मला काही अर्थाजन झाल नाही उलट मी घाम गाळून कमावालेले पैसे त्यात खर्च झाले. पण आता मागे वळून पाहिल्यावर त्याचा आनंदच होतो कारण त्यामुळेच मी कवी म्ह्णून खर्या अर्थाने उद्याला आलो आणि तेंव्हा पासून आता पर्यत कवी म्ह्णून आंम्ही अभिमानाने मिरवतोय. त्यानंतर माझ्या बर्याच कविता वेगवेगळ्या मासिकात, दैनिकात, दिवाळी अंकात , फेसबुकर माझ्या ब्लॉग वर आणि वेगवेगळ्या संकेतस्थाळांवर प्रकाशित होत होत्या. त्या सर्व कवितांना एकत्र करून मी माझे ई-बुक स्वरूपातील आतापर्यत चार कवितासंग्रह बुकगंगा डॉट कॉमच्या माध्यमातून प्रकाशित केले. पण माझे हे कविता प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची आवड असणार्या वाचकांपर्यत पोहचलेच नाहीत. अर्थात प्रत्यक्ष पुस्तक हातात धरून वाचण्याची आवड असणारयां वाचकांच्या आजूनही ई-बुक ही संकल्पना पचनी पडलेली दिसत नाही. ई-बुक आणि पत्यक्ष पुस्तक वाचणारा वाचकवर्ग सध्यातरी वेगवेगळा आहे. ई-बुक मो॑फत उपलब्ध करूनही वाचकांचा त्या पुस्तकांना अपेक्षित प्रतिसाद मिळ्त नसल्याचे दिसते. त्या उलट पुस्तक स्वरूपात आणि ई-बुक या दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार्या पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण भविष्यात कदाचित ई-बुक हाच उत्तम पर्याय म्ह्णून पुढे येण्याची शक्यता अधिक आहे. ई-बुक च्या माध्यमातून पुस्तकांचे जतन करणे आणि ते जगातील प्रत्येक काणाकोपर्यात पोहचविणे अगदी सहज शकय होते. ज्या- ज्या नवोदित लेखकांना कवींना आपल साहित्य प्रत्यक्ष पुस्तक रूपात प्रकाशित करणे काही तांत्रिक अथवा आर्थिक अडचणींमुळे शक्य नसेल ते आपल साहित्य वेळीच अत्यल्प खर्चात ई-बुक च्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचवू शकतात. ते जर वाचकांना आवडल तर त्यांचा प्रकाशात येण्याचा मार्ग लवकर मोकळा होऊ शकेल. नव्याने लिहायला सुरूवात केलेल्यांना आणि ज्यांच्या डोक्यावर कोणाचाही आश्वासक हात नाही अशा कवी आणि लेखकांना आपलं नशिब आजमावण्यासाठी ई-बुक हाच एक उत्तम पर्याय आहे.
— निलेश बामणे
Leave a Reply