ही कथा एका सामान्य घरातील स्त्रीची, जिला चार भिंतींपलिकडे आणि घरचा उंबरठा ओलांडून समाजासाठी काही कामगिरी करण्याची इच्छा असते. जिचं नाव आहे सुलभा महाजन आणि ही व्यक्तीरेखा साकारली आहे स्मिता पाटील हिने. पुढे ती एका महिला आश्रमात सुप्रीटेंडन्ट म्हणून रुजू होते, पण त्यासाठी आपल्या परिवारापासून तिला दूर रहावं लागतं. यामध्ये एक आई, पत्नी आणि नात्यांची जबाबदारी निभावताना स्वत:च्या अस्तित्वाची वेगळी ओळख प्रस्थापित करण्याची धडपड या चित्रपटातून उत्तमरित्या चित्रीत करण्यात आली आहे. डी.व्ही. राव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची सहनिर्मिती आणि दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी धुरा सांभाळली असून, हा चित्रपट “बेघर” या कादंबरीवर आधारीत आहे. २९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये उंबरठा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून गौरवण्यात आले होते.
चला तर मग पाहूया, उंबरठा या चित्रपटातील एक गाजलेले गाणे..
—
Leave a Reply