साहित्य –
तांदळाचे / ज्वारीचे पीठ – १ वाटी आंबट ताक – १ वाटी पाणी – १ वाटी मिरची, कोथिंबीर, जीर, लसुण – ४ ते ५ पाकळ्या सर्व एकत्र करुन पेस्ट – २ ते ३ चमचे तेल – अंदाजे फोडणीचे साहित्य, मीठ
कृती –
१) पिठामध्ये ताक, पाणी, मिठ वरील मसाल्याची पेस्ट सर्व घालुन पिठ सारखे करावे२) कढईत तेल तापवुन फोडणी करावी.३) फोडणीत वरील तयार पीठ हळू हळू ओतावे, सारखे ढवळत रहावे, गुठळी होऊ देऊ नये.४) झाकण ठेवून वाफ आणावी.५) मिश्रणाचा रंग बदलुन त्यावर चकाकी येईल, गॅस बंद करुन, तुप, तेल घालुन खायला द्यावे.
— सीमा कारुळकर
Leave a Reply