नवीन लेखन...

उतारवयांत जगतांना !

वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. कदाचित् वाढत्या वयानुसार

एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.

त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेले असेल. काहींनी खेळाचे मैदान नेत्रदिपकाने गाजविले असेल. कित्येकांनी आपल्या कलेने अनेकांना मंत्रमुग्ध केले असेल. आनंदाचा ठेवा ओंझळभरुन वाटला असेल. अशा व्यक्तीनासुद्धा ह्या काळातून जाताना बरेचसे सहन करीत जावे लागते. त्यांच्या तारुण्यातील उज्वल काळानी त्यांच्या म्हातारपणातील उणीवांवर पांघरुण घालण्याची असमर्थता दाखविली आहे.

जीवन व मृत्यु हे जेवढे सत्य आहे, तेवढेच म्हातारपण हे न टळले जाणारे एक आयुष्यातील सत्य जीवन आहे. जे सत्य असते ते ईश्वरांचे प्रतीक असून ते मान्य करताना त्याचे स्वागत झाले पाहीजे. जीवनाचा शेवट गोड व आनंदी करावयाचा असेल तर वृद्धापकाळ जीवनामधला अत्यंत महत्वाचा काळ समजला पाहीजे.
जीवनातील महत्त्वाचे टप्पे आहेत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि म्हातारपण. ह्यात खऱ्या अर्थाने आतिशय आनंददायक काळ म्हणजे वृद्धत्वाचा. परंतु हे केवळ त्याच वेळी शक्य आहे. जेंव्हा सुरवातीपासूनच ह्या काळाची जाणीव ठेऊन तुम्ही तुमचे आयुष्य मार्गक्रमण कराल.

मला उत्कृष्ठ खेळाडू, कलाकार, गायक, चित्रकार, वा कोणत्याही क्षेत्रामधील मान्यताप्राप्त नागरिक बनायचे आहे. हे तुम्ही बालवयांत अथवा तारुण्यांतच ठरवता वा योजता. त्यासाठी सर्व प्रकारे पोषक वातावरण निर्मिती करता. सर्व डावपेच लढून. अडचणीवर मात करुन आपले ध्येय साधण्याचा प्रयत्न करता. त्याच प्रकारे वृद्धापकाळाच्या स्वागतासाठी योजना करवी. त्याच्या स्वागतासाठीचा अभ्यास केलेला असावा. यामध्ये असेल तुमची वैयक्तीक क्षमता, झेप घेण्याची योग्यता, कौटूंबीक परिस्थीतीची जाणीव, सामाजीक धोरणांचा पूर्णपणे विचार , आणि देशहीत. सर्व बाबीवर वृद्धत्व सदैव अंतरमनाच्या स्थरावर असावे. (In Subconscious level)

१- प्रकृतिस्वास्थ हे नियमीत व्यायाम व योग्य आहार ह्याचीच देण असते.
धावपळीच्या जीवनामध्यें त्याची हेळसांड होणे शक्य असते. हे सतत ध्यानी असावे. सुदृढ प्रकृती हीच म्हातारपणांतील प्रमुख बाब ठरते. योग्य साधा व सर्व घटक खाद्यपदार्थानी परिपूर्ण आहार नियमीत घेण्याची काळजी व सवय ठेवावी. तो सकस व समतोल असावा. प्रसंगानुसार खाण्यातले बदल चवी आवडी इत्यादी ह्या येतातच. परंतु तुम्हास सतत जागृत राहणे फार गरजेचे असते.

खाण्यापिण्यातील मौजमजा आणि सवयी ह्यातील फरक जाणण्याच्या वैचारीक पातळीवर लक्ष नेहमी केंद्रित असावे. खाद्यामधल्या विवीध पदार्थांचे पचन शरिर ठरावीक वयापर्यंत सहज करु शकते. मात्र उतार वयांत त्याचे दुष्परीणाम उभारुन येतात. ते योग्यरीतीने जाणले पाहीजे. तेलकट तुपट चमचमीत पदार्थ, जास्त गोडीचे अंबट, तुरट हे पचनास कठीण, त्यांचा उपयोग कमी व्हावा. द्रव, पाणी भरपूर प्रमाणात घ्यावे.

२- आर्थिक स्वावलंबन
स्वाभिमानाने आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी बदलत्या काळानुसार आर्थिक स्वावलंबन हा आयुष्य सुखकर ठेवण्यातील महत्वाचा घटक असेल. आर्थिक बळ, त्याची जाण व त्याप्रमाणे योजना आखणे अत्यंत गरजेचे ठरते. पैशाची आवक बंद होणे वा घटणे हे तुमच्या धावपळीच्या शक्तीवर ठरते. जी वयोमानानुसार घटणारच. औषधपाणयाचा वाढता खर्च ही अत्यांत महत्वाची गोष्ट असते. भारतीय ज्येष्ठांचे वयोमान आता सत्तरीपर्यंत सहजगत्या गेलेले आहे. इतर खर्च जसे खाणे पिणे कपडालत्ता हे कदाचित् कमी होऊ शकतील. वेळ आल्यास आपले ताट इतरांना द्या. परंतु पाट केंव्हाच सोडू नका. असे कौटूंबीक जीवनाच्या अभ्यासकांचे मत आहे.

वयाची साठी येण्याच्या आधीच संसारीक चक्रातले जे सर्व सामान्य प्रश्न प्रत्येकाला सोडवावे लागतात. त्याची शक्यतो उकल करणे चांगले. जसे मुलां/मुलींचे शिक्षण, नोकरी वा उद्दोग आणि योग्यतेनुसार कमाई इत्यादी. ह्या कदाचित् मुलभूत समस्या असतील वा प्रत्येकांच्या जगण्याच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्यादेखील असू शकतील. दैनंदीन, मासिक, प्रासंगिक असे नियमीत खर्च होत राहतात. त्याची पद्धतशीर व्यवस्था अथवा योजना फार पुर्वीच करावी लागते. बॅंक, पोस्ट अथवा असाच संस्था तुमच्या ठेवीवर व्याज देते. विश्वासु व योग्य असा संस्थामध्ये गुणतवणूक करावी. तुमची आर्थीक पुंजी हेच तुमचे जगण्याचे साधन व समाधानाचे बळ असते. शासकिय वा सामाजिक बदलावर नियमीत लक्ष्य ठेवावे. प्रश्न निर्माण झाल्यास, कदाचित् सुटले जातील. परंतु उतारवयांत सहनशक्ती कमी होत गेल्यामुळे, मानसिक तणाव येत जातो. शरीरास हे हानी कारक ठरते. सतत सतर्क असण्याची वृत्ती अंगी बाळगावी.

३ छंद जोपासणे गरजेचे.
कांही छंद जसे वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला, संगीत, गायनकला, वाद्यकला, हे जोपासावे. घरगुती खेळ अथवा मन रमविणारे, कोणतेही नाद हे बालपणीच वा तरुणवयातच जोपासावे. जर तुम्हाला अंतर चेतना Inspiration असेल तर नशीबवानच. परंतु जर आवड वा रुची नसेल तरीही अशा सवयी जोपासाव्या. वृद्धापकाळांसाठी भरपूर वेळ मिळतो. धावपळीचे जीवन संपते. आणि वेळ कसा व्यतीत करावा ही सर्व साधारण समस्या उभी राहते. तुमचे असलेले छंद ह्यावेळी तुम्हास साथ देतील. मी हे त्या वयांत गरजेनुसार करील ह्या समजुतीला कोणताच अर्थ नसतो. ह्याची देखील योजना असावी. आवड निवड ह्या निर्माण करता येत नाही. त्याची बिजे पूर्व आयुष्यातच रोवावी लागतात.

ह्याच प्रकारे वृद्धत्व तर येणारच. तरी देखील, त्याची तयारी पूर्व नियोजन करुन केली जात नाही. आता मी निवृत्त झालो. म्हातारा होत आहे. ह्या विचारांनी त्याला सामोरे जाण्याचा सर्व साधारण प्रघात बनू पाहात आहे. जसे घरी अचानक आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत आणि

योजना आखून आलेल्या पाव्हण्यांचे स्वागत, ह्यांत निश्चीतच खूप तफावत असणार. दुसऱ्या प्रकारामध्ये आनंदा बरोबर योग्य स्वागताची जाणीव व समाधान असणार.

एका विद्वान व्यक्तीने एक प्रयोग सुचविला होता. मला वैयक्तिक खूप चांगला अनुभव आला. रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तीन गोष्टींचा विचार करावा.

दिवसभर मी काय केले. माझ्या हातून काय घडले. चांगले आणि वाईट वा अप्रिय गोष्टी. कांही वेळ त्यावर चिंतन करावे. त्यांत सुधारणा करणाचा संकल्प करावा. नंतर सर्व गोष्टी ईश्वराचे चरणी अर्पण कराव्यात.

येणारा उद्याचा दिवस चांगला जाऊन, आपल्याकडून चांगले काम व्हावे ही प्रार्थना करावी.

झोपण्यापूर्वी मृत्युची आठवण काढावी. मृत्यु हा तर निश्चित असतो. तो केंव्हातरी येणारच. त्याचे स्वागतपर विचार असावे. पण हे करताना त्याची भिती वा निराशेचा थोडा देखील विचार नसावा. एक आनंददायी समाधानकारक वातावरण निर्मिती व्हावी. मृत्यु येणार हे एक सत्य असले तरी माणसे त्याचा केंव्हाच विचार करीत नाही. व जे जीवन अनिश्चीत, असत्य असते, त्याचा मात्र सतत विचार होत असतो. मृत्युच्या चाहूलाची केवळ कल्पना मानसाच्या नितीमत्तेला खूप उंचावते. फक्त ती जाणीवपूर्वक असेल तर त्यातील भय भावना नष्ट झालेली असेल.

४ समाधानी वृत्ती
व्यक्तीला जे जीवन निसर्गाकडून मिळते, त्याची जाणीव प्रत्येकाला होतच असते. हाच खरा निसर्ग होय. तो स्वतःला पूर्णपणे जाणू लागतो. ह्यामध्ये प्रमुख समज येते ती वातावरण, परिस्थीती, स्थिती, आत्मशक्ती, क्षमता, अंतरचेतना, आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या सृष्टीवरील त्याची स्वतःची योग्यता. प्रत्येकने पांघरुन बघून आपले हातपाय पसरावेत म्हणतात ते याचसाठी. प्रत्येकाला दुरद्दष्टी दिलेली असते ती जगाचा आणि जगण्याचा अंदाज बांधण्यासाठी. ह्या पृथ्वीवर जन्मलो वाढलो, जगलो, सुखांचा शोध घेत घेत झगडलो, जे अंतीम मिळाले त्यामध्ये समाधानी झालो.

प्रत्येकाने ह्याच विचाराने आपली क्षमता पारखून जे निसर्गाने त्याच्या पदरांत घातले असेल त्यावर अत्यंत समाधानी राहावे.

५ मृत्युचे स्वागत.
जीवनाचा शेवट म्हणजे मृत्यु. हे एक अटळ सत्य आहे. ह्याची प्रत्येकाला जाणीव असते. त्या सत्याला मनापासून, अंतःकरणातून मान्यता द्या. त्याची वेळ देखील अनिश्चीत असते हे जाणा. परंतु निसर्ग तुम्हाला मृत्युच्या आगमनाची खूप आधीच चाहूल देत असतो. ती निर्भयपणे जाणून घ्या. त्याच्या स्वागताची तयारी ठेवा.

मृत्युला टाळण्यासाठी आपले सर्वस्व, आपल्या जीवनांत कमावलेली पूंजी वाया घालू नका. तुमच्या कष्टावर तुमच्यानंतर कुणी अवलंबून असतील तर तशी योजना करा.

तुमचे मृत्युपत्र योग्य विचार व भावनांची कदर करणारे असावे. संपत्तीची योग्यप्रकारे वाटणी करा. ज्यांत तुमच्या इच्छे बरोबरच अस्तित्वात असलेल्या कायद्याची पूर्ण कल्पना ठेवावी. कोणताही एखादा अट्टाहास, येणाऱ्या पिढीमध्ये तुफान वादळ निर्माण करु शकतो. ही समज ज्येष्ठांनी ठेवावी.

शेवटचे व महत्वाचे म्हणजे तुम्हाला मिळालेले जीवन फक्त एकदाच असते, ह्याची जाण असावी.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..