आपण माणस अनेक गोष्टीत कमी आहोत आणि याची जाणीव आपल्याला स्वस्थ बसू का देतेय हेच मला कळत नाही.” “पण म्हणून कृत्रिमरीत्या जनुकामध्ये बदल!!” कुणीतरी परत बोलल “तोच एकमेव मार्ग आहे या प्रश्नाचा.उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या जनुकात विशिष्ट बदल होत गेले तेच बदलाचे मूळ कारण आहेत.जनुकातील फेरफार माणसाची शेपटी नाहीशी होण्यासाठी त्याला कुठल्याही शस्त्रक्रियेची गरज नाही लागली.जनुकातील बदलामुळे ती हळू हळू नाहीशी झाली.याच पद्धतीने जर आपण काही विशिष्ट बदल जनुकाच्या मांडणीत केले तर आपल्याला त्याचे फार चांगले परिणाम बघायला मिळतील कदाचित आपण सर्वश्रेष्ठ ठरू या अशा बदलामुळे.” “पण हे बदल आपल्याला खरच हवे आहेत का?” “आपल्याला हवे ते बदल निसर्ग उपलब्ध करून देत असतो.आपण या अशा प्रयोगांकडे मानवीय भूक म्हणून बघतोय एक जगण्याची गरज म्हणून नाही” डॉ.गोडबोले यांच्या उत्तरावर वातावरण एकदम तापल होत. डॉ.गोडबोलेंच हे वाक्य म्हणजे डॉ.राव यांच्यावर सरळ-सरळ केलेला आरोप होता. डॉ.राव आता चिडणार अस सगळ्यांना वाटू लागल पण तस काही झाल नाही उलट डॉ.राव खूप शांतपणे म्हणाले “हा प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टीकोन असतो.काहीना ती भूख वाटेल काहीना लालसा तर काहीना तो पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याचा मार्ग वाटेल.कोणाला काय वाटत आणि काय
ाटू नये हे आपण कधीच ठरवू शकत नाही.” “तस नाही पण….” डॉ.गोडबोले उत्तर देणार इतक्यात व्यासपीठावरून घोषणा झाली.” सर्व मान्यवरांचे स्वागत आणि आभार.आपण आपल्या व्यस्त कामकाजातून येथे आलात त्याबद्दल धन्यवाद कार्यक्रम लगेच सुरु होईल आपण स्थानापन्न व्हावे”
Leave a Reply