उत्तर प्रदेश मधील ढुण्ढिराज गणपती काशी वाराणसीतील श्री काशिविश्वेश्वर मंदिराच्या परिसरात या गणेशाची मूर्ती आहे. ढुण्ढिराज गणेश क्षेत्र सर्वश्रेष्ठ म्हणून गणले जाते. भारतातील एकवीस गणेशस्थानांपकी ते एक आहे. त्याच्या प्रत्येक अवयवावर चांदी मढवलेली आहे. या मंदिराच्या पश्चिमेस आणखी एक यज्ञविनायक मंदिर आहे. काशीमध्ये धूपचंडी सरोवराच्या काठावर विकटद्विज विनायक; तर चित्रकूट सरोवराच्या पुढे विधिराज विनायकाचे मंदिर आहे. ढुण्ढी हा गणपती सर्व विनायकांचा मुख्य मानण्यात येतो. काशीमध्ये विश्वेश्वराच्या सभोवताली आठ आवरणांत प्रत्येकी आठ विनायक असून त्यांची नावे स्कंद पुराणांतर्गत काशी खंडात दिलेली आहेत.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply