रखरखत्या उन्हात
वाळवंटात भटकणाऱ्या
व्याकूळ वाटसरूची
मनोकामना तरी ,
काय असणार
ओंजळभर पाण्याची
लालसा .
अथांग वाळवंटातील
प्रत्येक वाळूच्या कणात
त्याला आभास होतो
पान्वठ्याचा
थेभर पांण्याला
ओंजळीत घेण्यासाठी
तो ,
अखं वाळवंट
पायथा घालतो .
मात्र ,
त्याची ओंजळ आजही
कोरडीच आहे
करपलेल्या वाळूसारखी
प्रभाकर कुबडे
रविनगर नागपूर 9422154759
— plkubade
Leave a Reply