मृग नक्षत्राला साजेशी
सुरूवात झाली
तहानलेली काळी आई
अमृतात न्हाली
आग ओकणारा सुर्य झाला
शांत, संयमी
गारव्याची लगीनघाई
संपली उन्हाची लाई
डोंगर-माळराने
हिरवा शालू नेसून नटली
हर्ष मातीपुत्राला
गालखळी खुदकन हसली
पेरतो शेतामध्ये धान्य
धान्यासंगे सुखस्वप्न
काळी आई आम्हा देईल
सुख समृद्ध जीवन
प्रणाम मातीपुत्राला
मायभुच्या निष्ठावंत लेकराला
ऊन, वारा, पाऊस
कसलेच भय नाही त्याला
घामापरी रक्त सांडतो
नवा जोश,उत्साह संचारतो
ढोरासंगे ढोरावानी राबतो
पोटच्या पोरापरी प्रेम सांडतो
मायभुमीशी अविरत ऋणानुबंध जपतो
अन् मातीचे ऋण फेडता-फेडता
शेवटी मातीशीच एकरूप होतो
— अनिल शिंदे
Leave a Reply