गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुध्द पंचमीस स्त्रिया हे व्रत करतात .
आपल्या श्रेष्ठ ऋषीच्या सत्विकतेला , त्यांच्या अंगी असलेल्या उदात्त गुणांना विनम्रतेने अभिवादन करून त्यांचे पूजन करण्याचे हे व्रत आहे . त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी हे व्रत अंगीकारून वैदिक , तत्वज्ञान , वैदिक धर्म आणि वैदिक संस्कृती ज्यांनी निर्माण केली त्या ज्ञान निष्ठांना , कर्म योग्यांना आणि तपोनिधींना या दिवशी व्रतस्थपणे आदरांजली वाहायला हवी. हे व्रत म्हणजे कश्यप, अत्री , भारद्वाज , विश्वामित्र , गौतम , जमदग्नी आणि वसिष्ठ या थोर सप्तर्षीची व अरुंधतीची पूजा आहे . उपवास करून केवळ हाताने पिकवलेली कंदमुळेच या दिवशी खावयाची असतात .
हे व्रत सात वर्षे सलग करावे असे शास्त्र सांगते . हि पूजा शुचितेचीअसल्याने आपल्या देहिक , मानसिक व बौद्धिक आचरणाच्या पातळीवरील अशुचीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक व सामाजिक दोष या व्रतामुळे दूर होतात असे मानले जाते.
ऋषीपंचमीला केल्या जाणार्या खास भाजीची कृती पहा…
संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply