होमिओपॅथीमध्ये आम्लपित्तावरती, तसेच कडूपित्तावर अत्यंत गुणकारी औषधे आहेत. ‘व्यक्ती तितक्याथ प्रकृती’ या म्हणीप्रमाणे प्रत्येकामध्ये ऍसिडिटीची वेगळी लक्षणे आढळतात. काहींना ऍसिडिटीमुळे पोटात जळजळते तर काहींना छातीत जळजळते. काही व्यक्तींना मळमळते, उलटी होते तर काहींना उलट्या कधीच होत नाहीत, नुसतेच मळमळते. काही व्यक्तींची ऍसिडिटी काहीतरी खाल्ल्यावर कमी होत, तर काहींना उपाशीपोटी बरे वाटते. ऍसिडिटीमुळे काही व्यक्तींची मान दुखू लागते, पित्त डोक्या त चढत आहे असे वाटते. काहींना आंबट घशाशी येते तर काहींना कडू पित्त होते. पित्त झाल्यावर काही व्यक्तींच्या पोटात बारीक दुखते तर काहींना अगदी आग पडल्यासारखी वाटते. काही रुग्णांमध्ये ऍसिडिटीमुळे गरगरते, चक्कर आल्यासारखी वाटते. पित्त वाढल्यामुळे काही व्यक्तींचे डोके जड झाल्यासारखे वाटते, दुखते तर काहींना खूप ढेकरा येतात. अतिविचार, अतिकाळजी करणाऱ्या व्यक्तींमध्ये पित्ताचा त्रास वरचेवर होतो. या प्रत्येक लक्षणासाठी विशिष्ट, वेगळे औषध होमिओपॅथीत उपलब्ध आहे. होमिओपॅथिक औषधे ही चवीला गोड व घ्यायला अत्यंत सोपी असतात. ही औषधे उपाशीपोटी घेतली तरी चालतात. या औषधांचे कोणतेही साईड इफेक्ट स होत नाहीत.ऍसिडिटी हा असा विकार आहे, की त्याला नुसते वरवरचे उपाय करून ते बरा होत नाही, मुळापासून त्यावर उपाय करावे लागतात. कोणत्याही रोगाचे समूळ उच्चाटन करणे हे होमिओपॅथिक औषधांचे वैशिष्ट्य असल्यामुळे होमिओपॅथीमुळे ऍसिडिटी पूर्णपणे बरी होऊ शकते. सततच्या ऍसिडिटी मुळे आतड्याला जखम होऊन ‘अल्सर’ होऊ शकतो. अल्सरकडेही दुर्लक्ष केले तर पोटदुखी होऊन तो आतल्या आत फुटून सेप्टीक होऊ शकते. त्यामुळे साध्या वाटणाऱ्या ऍसिडिटीकडे वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार करून घेणे हे केव्हाही हिताचे असते.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
Leave a Reply