एकटाच कालही होतो, आजही आहे
उद्या कदाचित नसेन मी…
सारे आकाश काल मोकळे होते, आजही मोकळे आहे
उद्या कदाचित तसे ते नसेलही…
एक स्वप्न, कालही होते, आजही आहे
उद्याही कदाचित असेल ते
मित्र काल जे होते, आज ते नाहीत
उद्याचे कोण ते माहीत नाही
जीवन कालही होते, आजही आहे
उद्याही असणार आहे
मी पतंग कालही उडत होतो, आजही उडत आहे
उद्या कदाचित पडलेलो असेनही…
कवी- निलेश बामणे.
— निलेश बामणे
Leave a Reply