एका निवांत समयी
एका निवांत समयी
मला तुझी आठवण आली
तुझ्या संगे घालविलेल्या
त्या क्षणांची आठवण आली.
एका निवांत समयी
हव्या हव्याश्या वाटणार्या तुझ्या
स्पर्शाची आठवण आली
तुझ्या चेहर्यावरून ओसंडणार्या
निरागस हस्याची आठवण आली.
एका निवांत समयी
तुला गमावल्याची ज्या क्षणी खात्री पटली
त्या क्षणाची आठवण आली.
तुला विसरण्यासाठी वाया घालविलेल्या
दिवसांची आठवण आली.
एका निवांत समयी तुझ्या विरहात लिहलेल्या
कवितांची आठवण आली
जिच्यामुळे नंतर तुला विसरलो
तिचीही आठवण आली.
एका निवांत समयी
आता तुंम्हा दोघींनाही गमावल्यावर
माझ्या हृद्यात निर्माण झालेल्या
पोकळीची आठवण आली.
आता ती पोकळी भरून
माझ्या हृद्यावर राज्य करू पाहणार्या
तिची ही आठवण आली.
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply