एकेकाळी माणसात माणुसकी होती…
पण आता आजकाळ तो जनावर झालाय…
एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा…
पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय…
एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या…
पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय…
एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची…
पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय…
एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची…
पण आजकाळ अतीऊच्च मदीरालयात जायची स्पर्धा जाणवतेय…
एकेकाळी छोट्याशा घरामध्ये नातेवाईकांची लगबग असायची…
पण आजकाळ मोठ्या फ्लॅटमध्ये फर्निचरची दाटी झालीय….
एकेकाळी अभिजात सुंदरतेसोबत लाजाळुपणा व शिष्टाचार असायचा….
पण आजकाळ ब्युटी पार्लरच्या ग्लोसोबत निर्लज्जपणा व बेशिस्तता वाढतेय…
एकेकाळी आजी-आजोबा घराचे आधारस्तंभ असायचे…
पण आजकाळ हेच आजी-आजोबा घराची अडगळ वाटतीय…
एकेकाळी स्वच्छ व निस्वार्थी राजकाराणी नेते असायची…
पण आजकाळ भ्रष्ट व निर्लज्ज राजकारणी नेते आपण पाहतोय…
एकेकाळी शाळाकॉलेजात विद्यार्थी पदवी घ्यायला जात असायची …
पण आजकाळ शाळाकॉलेजात विद्यार्थी देशद्रोह करायला जातात….
एकेकाळी पोलिस बेधडक व कायद्यात राहुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करायची…
पण आजकाळ तेच पोलिस राजकीय छायाछत्राखाली राहुन व हफ्ते घेऊन गुन्हेगारांना सहकार्य करतात..
एकेकाळी राजकीय मंडळी निस्वार्थपणे देशासाठी प्रार्णापण करायची…
पण आजकाळ राजकीय मंडळी स्वार्थासाठी देशालाही विकत आहेत….
जय हिंद…. वंदे मातऱम
— विवेक जोशी
Leave a Reply