पण हे थांबवता येऊ शकेल का ? खरोखर याला काही रामबाण उपाय आहे का ?
आज एकतर मोठ्या नोटा चलनात आहेत त्यामुळे हे प्रकार अधिक प्रमाणात घडतात. पण असो
आज आपण कोणाला तरी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट देतो. काय असते याची वटवायची मुदत? नक्कीच सर्वांना माहितीच आहे ६ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला तर आपला चेक किंवा डिमांड ड्राफ्ट वटत नाही. म्हणजे जरी चेक किंवा डिमांड ड्राफ्ट अगदी खाडाखोड न करता लिहिलेला असला तरी सदर चेक किव्वा डिमांड ड्राफ्ट वटवयाचा नाही हि सूचना RBI सर्व बँकांना देते. पण जी नोट आपण हाताळतो ती कधीही चालू शकते. यासाठी काही मर्यादा नाही असे का ?
जर नोटेला Expiry Date हि संकल्पना अस्तित्वात आणली तर? बघा थोडा विचार करा.
समजा एखाद्याने जर पैसा लपवून ठेवलेला असेल तर Expiry Date नंतर हा पैसा काहीही कामाचा नाही. म्हणजे जर चलनाला Expiry Date दिली तर त्या आधी सदर पैसा बँकेत जमा करणे आवश्यक असेल. आणि जर हा पैसा जवळच ठेवला तर तो फक्त रंगीत कागद म्हणून घरात पडून राहील. त्याचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे असे लबाडी करण्याचे प्रकार नक्कीच थांबतील असे मला तरी वाटते.
— सचिन सदावर्ते
Leave a Reply