बागेतील तारका-
भिरभिरणारे डबडबलेले
नेत्र भरले दाट ।
अतूरतेने शोधीत होते
आपल्या आईची वाट ।।
कासाविस तो झाला जीव
तळमळत राही प्राण ।
एकच ध्यास मनी लागला
कोठे गेली आई म्हणून ।।
क्षणाचाच होता विरह तेथे
न झाला तो ही सहन ।
आई हाच जर प्राण असेल,
तर तिजवीन ठरे जगणे कठीण ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply