एखाद्या मध्यरात्रीपासून रदद् व्हावी बेईमानी वागण्यातली
आणि चलनात यावी सच्चाई…
एखाद्या मध्यरात्रीपासून बंद व्हावा अविश्वास मनामनातला
आणि नवीन ताजातावाना विश्वास भरावा ह्र्दयात…
एखाद्या मध्यरात्रीपासून रद्दबातल व्हावा स्वार्थीपना संकुचित मनातला
आणि मनात उठावेत तरंग निःस्वार्थ भावनेचे….
एखाद्या मध्यरात्रीपासून संपून जावा द्वेष घाणेरडा
आणि हृदय ओथंबून वहावे निर्मळ प्रेमाने…
एखाद्या मध्यरात्रीपासून वाईट भावना ठराव्यात अवैध
आणि सद्भावना रुजावी प्रत्येक मनामनात…
एखाद्या मध्यरात्रीपासून बेकायदेशिर व्हावी धोखेबाजी
आणि आपलेपणा अंकुरावा माणसाच्या अंत:करणात…
एखाद्या मध्यरात्रीपासून नष्ट व्हाव्यात सर्व चिंता
आणि ऊगवावी एक सकाळ सकारात्मक विचारांची…
एखाद्या मध्यरात्रीपासून माणूस बनावा
अगदीच माणसासारखा…
जुन्या वाटा बदलायला त्याने घ्यावा काही दिवसांचा वेळ अधिकृतपणे
पण त्याने बदलावी आपली नियत एखाद्या मध्यरात्रीपासून ….
आणि एकदा त्याच्या नियतीने वाटा बदलल्या की मग
पुन्हा पुन्हा नाही पडणार गरज नोटा बदलण्याची…
हे मात्र घडावेच अगदी एखाद्या मध्यरात्रीपासून….
Forwarded Post
Leave a Reply