फार्मसी म्हणजे औषधनिर्माण शास्त्र. या शाखेत बारावीनंतरचार वर्षांची बी. फार्म. पदवी किंवा त्यानंतर दोन वर्षांनी एम.फार्म. पदवीमिळवलेल्यांना खासगी औषध उत्पादन कंपन्यांमध्ये व खालील इतर संधी उपलब्ध असतात. फार्माकोलॉजीच्या अभ्यासकांना ‘फार्मासिस्ट’ म्हणतात.डॉक्टरांनी रुग्णाला उपचारासाठी दिलेली औषधी द्रव्ये, मलम, गोळ्या, पावडरतसेच इंजेक्शन्स तयार करणं किंवा त्यांचे मिश्रण करण्याचं ट्रेनिंग फार्मासिस्टनामिळालेलं असतं. त्यांना संशोधन आणि विकास, उत्पादनतपासणी, दर्जा नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल), औषधांचापुरवठा, विपणन आणि विक्री अशा अनेक क्षेत्रांत वावआहे.
फार्मसीमध्ये पदवी शिक्षण घेऊइच्छिणा-यांसाठी आवश्यक पात्रता :
एचएससी/तत्सम परीक्षेत विज्ञान शाखेत ५०टक्के गुण आवश्यक असते.
- संबंधित प्रवेश परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व इंग्रजी या विषयांमध्ये पात्र ठरणेआवश्यक असते.
- काही संस्थांमध्ये गणित विषयातही ठराविक गुण असावेलागतात.
प्रशिक्षण कोर्सेस :
डिप्लोमा इन फार्मसी (डी.फार्म.) : २ वर्षे. यातटॉक्सिकोलॉजी, फार्मास्युटिकल ज्युरिसप्रुडन्स, औषधांचीसाठवण व व्यापार व्यवस्थापन या विषयांचा समावेश होतो.
बॅचलर इन फार्मसी (बी.फार्म.) : ४ वर्षे. यातइनऑरगॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, अॅनोटॉमी, बायोकेमिस्ट्री, टॉक्सिकोलॉजी व औषधनिर्मिती शास्त्रासंबंधी कायदे याविषयांचा समावेश होतो.
मास्टर्स इन फार्मसी (एम.फार्म.) :२ वर्षे.
फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोम्नोसी व अॅनिमल फार्माकोलॉजी यातस्पेशलायझेशन करता येतं.
पीएच.डी. : ३ ते ५वर्षे.
फार्मासिस्टसाठी नोकरीच्या संधी :
(अ) खासगीकंपन्यांमध्ये
- प्रारंभी : ४,००० रु.वेतन
- ५ वर्षानंतर १० ते १५ हजार (अनुभवानुसार)
- या जागा मुलाखत, चाचणी इ.कंपनीच्या नियमांप्रमाणे भरल्या जातात.
रिसर्च लॅबोरेटरी : फार्मास्युटिकलटेक्नॉलॉजिस्टना (एम.फार्म./ पीएच.डी.) खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमधीललॅबोरेटरीजमध्ये नवीन व उपयुक्त औषधांची निर्मिती करण्याचे काम करावे लागते. ज्यातत्यांना उत्तम मोबदला मिळतो.
मेडिकलचे दुकान आणि फार्मसी : आपल्यादेशातील बहुसंख्य फार्मासिस्ट या क्षेत्रात काम
करताना दिसतात. राज्य फार्मसीपरिषदेत नोंदणी केल्यानंतर फार्मासिस्ट स्वत:ची फार्मसी सुरू करूशकतात.
फार्मास्युटिकल मार्केटिंग : फार्मसीच्यापदवीधरांना मेडिकल रिप्रेझेन्टेटिव्हचे क्षेत्र खुले आहे. जेवढी मेहनत तेवढी प्रगतीअसं हे चोख क्षेत्र आहे. यातील पुढील प्रमोशन्स भरपूर वेतन मिळवून देतात. अगदी २०हजारांपर्यंतही मासिक प्राप्ती होऊ शकते.
मेडिकल फिल्ड : या क्षेत्रात ट्रान्स्क्रिप्शनिस्टकिंवा एडिटर हे ‘श्राव्य वैद्यक अहवाल’ शब्दबद्धकरण्याचे कार्य करतात. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणा-या बी.फार्म.च्याविद्यार्थ्यांना या क्षेत्रात विलक्षण प्राधान्य आहे. यातही उत्तम वेतनमिळते.
(ब) सरकारीरुग्णालयांत
- प्रारंभी : ३,५०० ते५,००० रु.पर्यंत वेतन
- ५ वर्षानंतर ६,५०० ते१०,००० रु.पर्यंत वेतन मिळते.
- या जागा लोकसेवा आयोगातर्फे भरल्या जातात.
— शेखर बोबडे
Leave a Reply